Nashik : 'या' जमिनींना येणार सोन्याचा भाव; नवीन एमआयडीसींसाठी होणार हजार हेक्टरचे भूसंपादन

MIDC
MIDCTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील सातपूर, अंबड व माळेगाव या प्रमुख औद्योगिक वसाहतींव्यतिरिक्त (MIDC) दिंडोरीत नव्याने अक्राळे औद्योगिक वसाहत आकार घेत आहे. मात्र, सातपूर, अंबड व माळेगाव येथील उद्योगांना जागा कमी पडत असल्यामुळे जिल्ह्यात जाबुटके (दिंडोरी), मापारवाडी (सिन्नर) व मनमाड येथे नव्याने औद्योगिक वसाहतींसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच इगतपुरी तालुक्यातही आडवण व पाटदेवी येथे नवी औद्योगिक वसाहत उभारण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.

MIDC
Nashik : अखेर सिन्नर एमआडीसीतील बंद उद्योगाच्या भूखंडाचे 60 तुकडे करण्याचा निर्णय मागे

यासाठी आडवण येथे २६२.९७, तर पाटदेवी येथे ५३ अशी एकूण ३१५.९७ हेक्टर जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रस्तावित औद्योगिक वसाहतींसाठी भूसंपादन झाल्यास जिल्ह्यात उद्योगांसाठी जवळपास हजार हेक्टरवर भूखंड उपलब्ध होणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात १४ औद्योगिक वसाहती असून, त्यापैकी अंबड आणि सातपूर या दोन प्रमुख वसाहती नाशिक शहरात आहेत, तर सिन्नर तालुक्यात माळेगाव औद्योगिक वसाहत आहे. सिन्नरमध्येच गुळवंच-मुसळगाव येथे इंडियबुल्स सेझ असून जवळपास १२०० हेक्टर भूसंपादन होऊनही १८ वर्षांपासून तेथे एकही उद्योग सुरू होऊ शकला नाही. यामुळे ती जागा परत घेण्याच्या उद्योग विभागाकडून हालचाली सुरू आहेत.

MIDC
Surat-Chennai Highway : नाशिक तालुक्यातील 36 शेतकरी जमिनी देण्यास तयार मात्र दराबाबत...

सातपूर व अंबड येथील औद्योगिक वसाहती शहरालगत असल्यामुळे तेथे विस्तारिकरणाचा पर्याय बंद झालेला आहे. परिणामी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांना जागेची चणचण भासत आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये नवीन औद्योगिक वसाहती उभी करण्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे.

यापूर्वीच दिंडोरी तालुक्यातील जांबूटके येथे ३१.५१ हेक्टर, सिन्नर तालुक्यातील मापारवाडी येथे २३०.६७ हेक्टर, राजूरबहुला येथे १४४.४३ हेक्टर, मनमाड येथे २६८.८७ हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात आता इगतपुरी तालुक्यातही नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील घोटी, आडवण येथे २६२.९७ हेक्टर तर पाटदेवी येथे ५३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. इगतपुरी तालुक्यात सध्या गोंदे, वाडीवर्हे या भागात उद्योगांनी खासगी जमिनी घेऊन तेथे उद्योग सुरू केले आहेत. मात्र, या उद्योगांना ग्रामपंचायतींकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच अनेक ग्रामपंचायती उद्योगांना त्रास देत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

यामुळे येथील उद्योजकांकडून सातत्याने एमआयडीसी प्रशासनाकडे सुविधांसाठी पाठपुरावा केला जात आहे. यामुळे एमआयडीसीने नव्या औद्योगिक वसाहतीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

MIDC
Pune Airport : कटकट संपली; पुणे विमानतळावर 'या' प्रवाशांना का मिळतोय अवघ्या काही सेकंदात प्रवेश?

इगतपुरी येथील औद्योगिक वसाहत दळणवळणाच्या दृष्टीने मुंबई-पुण्यातील उद्योगांसाठी सर्वाधिक सोयीस्कर ठरू शकणार आहे. दरम्यान आडवण आणि पाटदेवी येथे भूसंपादनाची प्रक्रिया तेजीत सुरू असतानाच ५० शेतकऱ्यांनी यास हरकती घेतल्या आहेत. मात्र, त्यांच्या अडचणी समजून घेऊन या भूसंपादन प्रक्रिया पार पाडली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रस्तावित भूसंपादन
जांबूटके, दिंडोरी - ३१.५१ हेक्टर
मापारवाडी, सिन्नर - २३०.६७ हेक्टर
राजूरबहुला, नाशिक - १४४.४३ हेक्टर
घोटी (आडवण) - २६२.९७ हेक्टर
पाटदेवी - ५३ हेक्टर
मनमाड - २६८.८७ हेक्टर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com