Nashik : मिशन भगीरथमधून पावसाळ्यापूर्वी होणार 150 बंधाऱ्यांची कामे

Nashik ZP
Nashik ZPTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे करण्यासाठी मिशन भगीरथ हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेतून सध्या १५ तालुक्यांमध्ये सिमेंट बंधाऱ्यांची ३१ कामे पूर्ण झाली असून ३० जूनपर्यंत या योजनेतून जवळपास १५० सिमेंट बंधारे पूर्ण होणार आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी ज्या सुरगाणा तालुक्यासाठी विकास कामे करण्याच्या सूचना दिल्या, तेथे आतापर्यंत केवळ एकच सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे एरवी विकासाच्या बाबतीत मागे असणारा सुरगाणा त्याच तालुक्यासाठी तयार केलेल्या मिशन भगीरथमध्येही पिछाडीवरच आहे.

Nashik ZP
राज्यातील 88 हौसिंग प्रोजेक्ट रद्दचा प्रस्ताव; सर्वाधिक पुण्यात

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरगाणा तालुक्यातील काही गावांच्या सरपंचांनी विकास होत नसल्यामुळे गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींची धावपळ उडाली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरगाणा तालुक्यातील गावांचे सरपंच व प्रशासन यांची बैठक घेऊन सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करून तेथील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा यांचा आढावा घेतला. यामुळे सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दिल्या. 

Nashik ZP
ठाणे क्लस्टर: पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे अन् 1500हेक्टर जागेवर..

त्यात पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे त्या तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतर होत असल्याचा मुद्दा समोर आला. हा केवळ सुरगाणा तालुक्यातीलच नाही, तर संपूर्ण आदिवासी भागाचा प्रश्‍न असल्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी मिशन भगिरथ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना जलसंधारण विभागाला दिल्या. त्यानुसार जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यात सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडेारी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव नाशिक, इगतपुरी, सिन्नर  या तालुक्यांमधील १५६ गावे निश्‍चित करण्यात आली आहेत. प्रत्येक गावामध्ये पाच ते सहा बंधारे बांधण्यात येणार आहेत. यात पाच ते ३० लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधाऱ्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांच ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून मार्चपासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

Nashik ZP
Sambhajinagar : महामार्गावरील 613 कोटीच्या दुरूस्तीनंतरही खड्डेच..

मिशन भगीरथ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून १५ तालुक्यांमध्ये जलसंधारणाची ६२५ कामे प्रस्तावित असून या कामांची रक्कम जवळपास ११० कोटी रुपये आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १५ तालुक्यांमधील १५६ गावांमध्ये पाच ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान सिमेंट बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. या योजनेतून सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक ११३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी केवळ ११ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या मंजूर कामांपैकी केवळ सात कामे सुरू असून त्यातील केवळ एक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी उरण होतील, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

Nashik ZP
Nashik : 30 टक्केच देयकांमुळे रखडणार जलजीवनची कामे

अडचण कोठे?

रोजगार हमी योजनेतून बंधारे बांधण्यासाठी ९० टक्के काम यंत्राने व १० टक्के काम मजुरांकडून करून घेण्याची परवानगी आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठीचे ६०:४० प्रमाण राखत जिल्हा परिषदेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सुरगाणा तालुक्यातून बाहेरच्या भागात रोजगारासाठी मोठ्याप्रमाणावर स्थलांतर होत असते. यामुळे जलसंधारण विभागाने सुरगाण्यात अधिक कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये मजुरांकडून केवळ १० टक्के काम करून घ्यायचे असूनही नेमके सुरगाणा तालुक्यातील कामे संस्थगतीने सुरू आहेत. याबाबत कोणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही.

तालुकानिहाय पूर्ण कामे

तालुका    पूर्ण झालेली कामे

बागलाण    ५

चांदवड   ३

देवळा   ५

दिडोरी   १

इगतपुरी   २

कळवण    ०

मालेगाव     ४

नांदगाव    ५

नाशिक   ०

निफाड    ०

पेठ        २

सिन्नर        ०

सुरगाणा     १

त्रिंबक      ३

येवला    ०

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com