नाशिकला सरकारी मेडिकल कॉलेजसाठी ४३८ कोटींची प्रशासकीय मान्यता

Medical College
Medical CollegeTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला राज्य सरकारने ४३८ कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अनेक वर्षांची नाशिककरांची मागणी लवकरच पूर्णत्वास येणार आहे.

Medical College
अखेर महाराष्ट्रात कंपनी आली;'सिनार्मस' करणार 20000 कोटीची गुंतवणूक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेने वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याकरता १० फेब्रुवारी २०२१ रोजी राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देऊन ०५ एप्रिल २०२१ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ६२७.६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी २९ मार्च २०२२ रोजी त्रुटींची पूर्तता करून शासनाला सादर केलेला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या उच्चस्तर समिती बैठकीमध्ये या विषयाला मंजुरी मिळालेली होती.

Medical College
सरकारच्या धोरणालाच हरताळ; 'मलई'च्या पोस्टिंगचे फुटले टेंडर

या शैक्षणिक वर्षापासून नाशिक येथे विविध ७ विषयांमध्ये महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यक परिषदेने मान्यता दिलेली असून जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे ०९ एप्रिल २०२२ रोजी पदव्युत्तर वैद्यकीय विभाग स्थापन करण्यात आला आहे. या पदव्युत्तर संस्थेसाठी अधिष्ठाता यांची २१ फेब्रुवारी २०२२ रोजी नेमणूक करण्यात आली असून इतर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांच्यासुद्धा नेमणुका करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जवळपास १५ विषयांमध्ये वर्ष निहाय ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा मिळणार आहे.  शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या इमारतीमध्ये सद्यस्थितीत सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

Medical College
अखेर अदानींनी जिंकलं!; मुंबईतील 'ते' ५ हजार कोटींचे टेंडर खिशात

या मेडिकल कॅम्पससाठी अधिकच्या जागेची आवश्यकता असल्यामुळे विद्यापीठाला लागून असलेली म्हसरूळ येथील नाशिक महापालिकेची गट क्रमांक २५७ मधील १४  हेक्टर जागा आरोग्य विद्यापीठास देण्याचा नाशिक महापालिकेने ठरावही केलेला आहे. त्या ठरावानुसार नगरविकास विभागाने ती जागा वैद्यकीय महाविद्यालयाास देण्यास काही अटींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. दरम्यान या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती. यामुळे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले होते, असे भुजबळ यांच्या कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com