सरकारचा निर्णय : समृद्धी महामार्गाच्या 22 इंटरचेंजवर उभारणार औद्योगिक शहरे

Samruddhi Mahamargh
Samruddhi MahamarghTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजलगत इंडस्ट्रियल टाऊनशिप (औद्योगिक शहर) उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या मार्गावरील जवळपास २२ ठिकाणी अशी औद्योगिक शहरे उभारण्याबाबत रस्ते विकास महामंडळाकडून चाचपणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे उद्योजकांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या.

Samruddhi Mahamargh
मृत्यू तांडवानंतर सरकारला जाग: नव्या वर्षापासून औषध खरेदी दर करारानुसार; टेंडर प्रक्रिया बंद

समृद्धी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या तालुक्यांमधील तीन इंटरचेंजलगत औद्योगिक शहरे उभारण्याबाबत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांसह दत्तप्रसाद नडे, श्रीमंत पाटोळे, राजेश कातकर या अधिकाऱ्यांनी निमा हाउस येथे नाशिक येथील उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी संभाव्य टाऊनशिपचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धोत्रे, अहमदनगर जिल्ह्यातील सावळीविहीर, सिन्नर तालुक्यातील गोंदे, इगतपुरी तालुक्यात घोटीजवळ टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याची माहिती कैलास जाधव यांनी दिली.

Samruddhi Mahamargh
Bullet Train : मुंबई-अहमदाबादला जोडणारा पहिला माउंटन बोगदा तयार

नागपूरपासून मुंबईपर्यंत समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी इंटरचेंज आहेत. या इंटरचेंजच्या लगत असणारी भौगोलिक व इतर परिस्थिती लक्षात घेऊन या इंटरचेंजलगत शिक्षण, पर्यटन, कृषी प्रक्रिया,औद्योगिक, मेडिकल अशा वेगवेगळ्या वसाहती उभारल्या जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.  यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील उद्योजकांशी बोलून त्यांच्याकडून याबाबत माहिती मागवली जात आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोणत्या प्रकारचे औद्योगिक शहर उभारायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या औद्योगिक शहरांमध्ये एमआयडीसीप्रमाणेच उद्योजकांना जागा दिली जाणार आहे. तसेच पायाभूत सुविधा रस्ते विकास महामंडळच पुरवणार आहे. समृद्धी महामार्गाला साधारणपणे नागपूर- भंडारा- गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर-गडचिरोली एक्सप्रेस वे, नागपूर-गोवा एक्सप्रेस वे, पुणे -छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस वे, पुणे-नाशिक महामार्ग,  सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे हे सात महामार्ग जोडले जाणार आहेत. यामुळे निर्माण झालेल्या नवीन इंटरचेंजवरही औद्योगिक शहरे उभारली जाणार आहेत.

Samruddhi Mahamargh
Mumbai : उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी नव्याने 12000 स्वच्छतागृहे; 628 कोटींची...

या ठिकाणी होणार औद्योगिक शहरे
एमआयडीसी बुटी बोरी,  सिंधी ड्राय पोर्ट, वर्धा, आर्वी - पुलगाव, धामणगाव रेल्वे, यवतमाळ - अमरावती, कारंजा लाड,  सेलू बाजार, मालेगाव जहांगीर, मेहकर, दुसरबिड, सिंदखेड राजा, जालना, शेंद्रा, छत्रपती संभाजी नगर, वेरूळ, लासूर, वैजापूर, शिर्डी, सिन्नर, नाशिक कनेक्टर, इगतपुरी, शहापूर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com