नाशिक (Nashik) : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासंदर्भात (Surat-Chennai Greenfield Highway) पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. आता लवकरच सूरत चेन्नई ग्रीनफिल्डसाठी नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 996 हेक्टर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाशिवाय सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित आहे. प्रस्तावित सुरत चैन्नई महामार्गासाठी जिल्ह्यातील 609 गावांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी 996 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात 122 किलोमीटर अंतराचा हा महामार्ग असणार आहे.
सहा तालुक्यांतून जाणार मार्ग
महामार्गामुळे सुरत चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर 1250 किलोमीटरपर्यंत न कमी होणार आहे, तर नाशिक सुरत दरम्यानचे अंतर अवघे 176 किलोमीटरवर येणार आहे. नव्या महामार्गामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही औद्योगिकदृष्टया महत्वाची शहरे जोडली जाणार आहे. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर अशा सहा तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे.
असा आहे ग्रीनफिल्ड प्रकल्प
- दीड वर्षात जमीन अधिग्रहण.
- अधिग्रहणानंतर पुढील ३ वर्षात हायवे कार्यन्वित.
- 996 हेक्टर जमीन करावी लागणार अधिग्रहीत.
- 69 गावांपैकी दिंडोरीतील सर्वाधिक 23 गावांचा समावेश.
- सिन्नरला वावीत समृद्धी महामार्ग परस्परांना भेदणार
- नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात प्रकल्पाची उभारणी.
- राज्यात राक्षसभवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेश.
- अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे राज्यातील शेवटचे टोक.
- नाशिक ते सोलापूर अंतर 50 किलोमीटरने होणार कमी.