Nashik : मालेगाव-अजंग एमआयडीसीत 500 कोटींची गुंतवणूक

औद्याेगिक वसाहतीतील २७ प्रकल्पांचे भूमिपूजन
MIDC
MIDCTendernama
Published on

नाशिक (Nashik) : मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव औद्याेगिक वसाहतीतील २७ प्रकल्पांचे भूमिपूजन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांच्या माध्यमातून या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्या माध्यमातून दोन हजार रोजगाराची निर्मिती होणार असल्याची माहिती माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.

MIDC
Aditya Thackeray : 'बीएमसी' कामाआधीच ठेकेदारांना 650 कोटी देणार

राज्य सरकार जिल्हानिहाय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून रोजगाराला चालना देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बँका मोठ्या उद्योगांच्या दारात बँका जातात, पण तरुणांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. सहकारी बँकांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतले. हीच अपेक्षा राष्ट्रीयकृत बँकांकडून आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून २५ हजार उद्योजक तयार करावयाचे आहेत, असेही उद्योगमंत्री सामंत यानी सांगितले.  

MIDC
Mumbai : पूर्व, पश्चिम मार्गांच्या दुरुस्तीसाठी 250 कोटींचे टेंडर

यावेळी पालकमंत्री दादा भुसे, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार मंजुळा गावीत, प्रसाद हिरे आदी उपस्थित होते. दादा भुसे म्हणाले, वसाहतीत पाचशे कोटीचे २७ प्रकल्प सुरु होणार असल्याने दोन हजार रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. प्रकल्पांसाठी पाणी, रस्ते, वीज आदी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. सामंत व भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्रीराम भोर यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या पाच प्रकल्पांचे कर्ज मंजूरीचे १५ कोटीचे धनादेश संबंधित उद्योजकांना वाटप करण्यात आले.

MIDC
Mumbai : गुड न्यूज; 'ती' आली, 'ती' धावली अन् 'ती' जिंकली!

मनमाड एमआयडीसीसाठी महिनाभरात भूसंपादन
मनमाड शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या करंजवण-मनमाड या ३११ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मनमाड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनमाड येथे शिवसृष्टीचे लोकार्पण केले. तसेच मनमाड नगरपरिषदेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी मनमाड औद्योगिक वसाहत मंजूर करण्यात आली असून महिनाभरात या एमआयडीसीसाठी भूसंपदान प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, आमदार सुहास कांदे, आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी डी. गंगाधरन, सीईओ आशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com