Nashik : आता नाशिकमधून नागपूर, गोवा, अहमदाबाद विमानसेवा

ओझरहुन इंडिगो दहा उड्डाणे सुरू करणार
Nashik Airport Ozar
Nashik Airport OzarTendernama
Published on

नाशिक (Nashik) : अनेक महिन्यांपासून विस्कळित झालेली नाशिकची विमानसेवा पुन्हा सुरळीत होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. इंडिगो या देशातील प्रमुख व्यावसायिक विमान कंपनीनेही १५ मार्चपोसून नाशिकहून नागपूर, गोवा आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून त्याचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. याबरोबरच आता नाशिकहुन आणखी आता आणखी सात शहरांकरिता विमानसेवा सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Nashik Airport Ozar
PM Modi : भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पंतप्रधानांकडून गिफ्ट!

नाशिकहुन यापूर्वी एअर व स्पाइसजेट या विमान कंपन्यांची दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव व हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू होती. बेंगळुरू व गोव्यासाठीही
लवकरच सेवा सुरू केली जाणार होती. मात्र, केंद्र सरकारच्या उडान योजनेची मुदत संपल्याने अलायन्स एअर व स्टार एअर या दोन कंपन्यांनी २०२२ मध्ये सेवा बंद केल्या. स्टार एअरने आधीच सेवा बंद केली, तर अलायन्स एअरने २६ ऑक्टोबरला २०२२ पासून विमाने बंद केली होती. त्यामुळे केवळ स्पाइसजेटच्या दिल्ली व हैदराबाद या सेवा सुरू होत्या.

Nashik Airport Ozar
Nashik : नाशिकरोड वासीयांची दूषित पाण्यापासून सुटका होणार

मात्र, त्या विमान सेवांबाबत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी असल्याने ओझरहुन विमानसेवा विस्कळित झाली होती. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी नाशिकच्या विमानसेवेबाबत चर्चा केली होती. खासदार हेमंत गोडसे यांनीही पत्रव्यवहार केला होता. दरम्यान इंडिगो या आघाडीच्या विमान कंपनीने नाशिकहुन सेवा सुरू करतानाच ती सेवा आणखी विस्तारित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे नाशिकच्या विमानसेवेला अच्छेदिन येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Nashik Airport Ozar
Nashik ZP : काम न करताच काढले रस्त्याचे बिल

इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नाशिकहुन विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर नाशिकमधील प्रमुख २० संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबोत बैठक घेतली. यावेळी नाशिककरांकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी निमा, आयमा, तान, निटा, मी नाशिककर, क्रेडाई यांसारख्या प्रमुख २० संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. इंडिगो प्रति दिवसी नाशिक विमानतळावर दहा लँडिंग आणि तितकेच टेक अप करण्याचे नियोजन करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, यावेळी विमानसेवेचे दर अडीच ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान ठेवाव्यात अशी मागणी पुढे आली. विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळणार असल्याने इतर शहरांकरिता सेवा सुरू करण्यासाठी आत्ताच पाऊल उचलावे, अशी मागणी या बैठकीत उपस्थितांनी केली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com