Nashik : गोदापात्रातील बांधकामे टाळण्यासाठी ‘नमामि गोदा’ आराखड्यात बदल करणार

Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : 'नमामि गोदा' प्रकल्पातील आधीच्या आराखड्यात समाविष्ट केलेली अनेक कामे पूररेषेच्या आत येत आहेत. त्यामुळे निरी व उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा अवमान होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने नमामि गोदा या प्रकल्पाचा आराखडा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नमामि गोदा प्रकल्पाचा फेरआराखडा तयार केला जात आहे. सुधारीत आराखडा जूनमध्ये आयुक्तांना सादर केला जाणार आहे. स्मार्टसिटी कंपनीने पुण्यश्लोक होळकर पुलाच्या खालच्या बाजूला गोदावरी पात्रात मेकॅनिकल गेटच्या कामासाठी खोदकाम केल्याने स्मार्टसिटी कंपनी व महापालिका अडचणीत सापडले आहेत. भविष्यात नमामि गोदा प्रकल्पांतर्गत कामे सुरू झाल्यानंतर पुन्हा तोच मुद्दा समोर येऊ शकतो, हे लक्षात घेऊन महापालिकेने नमामि गोदा प्रकल्पाच्या आराखड्यात त्यादृष्टीने बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

Nashik
Nashik : महापालिकेचे नालेसफाईचे 75 टक्के काम पूर्ण; देखभाल दुरुस्तीच्या 30 कोटींमधून काम सुरू

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यानिमित्ताने गोदावरी प्रदूषणमुक्त करणे, गोदावरी बारा महिने वाहती करणे तसेच गोदावरीचे सौंदर्यीकरण करून पर्यटनाला चालना देणे या हेतुने वाराणशी येथील नमामि गंगेप प्रकल्पाप्रमाणे नाशिक येथे नमामि गोदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने यापूर्वीीच या प्रकल्पाच्या २,७८० कोटी रुपयांच्या योजनेला तत्त्वतः मान्यता देतानाच १,८०० कोटी रुपये देण्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. महापालिकेने यापूर्वीच जलशक्ती मंत्रालयाला राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ व आधुनिकीकरण तसेच मल जलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्तावदेखील सादर केला होता. त्यानुसार जलशक्ती मंत्रालयाने हे दोन्हीं प्रस्ताव एकत्रित करून सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने अलमण्ड्स ग्लोबल सिक्युरिटीज या सल्लागार कंपनीची प्रकल्प सल्लागार संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. या सल्लागार संस्थेने नमामि गोदा प्रकल्पांतर्गत गोदापाट विकासाचा प्रारूप आराखडा दोन महिन्यांपूर्वी सादर केला होता. त्यात जवळपास ५७ कोटीच्या बांधकाम विषयककामांचा समावेश केला आहे. तसेच मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढही अंतर्भूत केली आहे. तसेच पर्यटनाला बालना देण्याच्या दृष्टीनेही गोदावरी सौंदर्यीकरणाच्या कामांचाही समावेश केला आहे. मात्र, या ही सर्व कामे ही गोदावरी पात्राच्या लगत व पूररेषेच्या होत होणार आहेत. मागील महिन्यात होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेटचे काम गोदावरीच्या पात्रात सुरू केल्यामुळे महापालिका व स्मार्टसिटी कंपनी अडचणीत आलेल असल्यामुळे महापालिकेने या प्रकल्पाबाबतही न्यायालयीन अवमानाचा मुद्दा उपस्थित व्हायला ननो म्हणून संपूर्ण प्रकल्पाचीच फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पंधराव्या वित्त आयोगाचे 318 कोटी पडून

असा होणार खर्च
मलनिस्सारण केंद्रांचे अद्यावतीकरण आणि सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया : ३९८.१८ कोटी.
 जुन्या मलवाहिका बदलणे व नव वसाहतींमध्ये मलवाहिकांचे जाळे तयार करणे  : ९२७, ३४ कोटी रुपे
नवीन मलनिस्सारण केंद्रांची उभारणी :  ६२२.०९ कोटी.
गोदावरी विकास व सौंदर्याकरण - ८३२.६३ कोटी.

नमामि गोदा प्रकल्पातील कामे
गोदाघाटाची पुन:उभारणी व मनोरंजनस्थळ उभारणे
कुसुमाग्रज उद्यानात पोहोचण्यासाठी बोट व्यवस्था
नवशा गणपती येथे घाट विकास, पार्किंग सुविधा
 बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे नूतनीकरण
सोमेश्वर धबधबा ते सोमेश्वर मंदिर दरम्यान रोप-वे तया करणे
तपोवनात लक्ष्मण झुला येथे नवीन पूल, 'लेझर शो'

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com