Nashik : नोटप्रेसला नवीन मशिनरीसाठी 208 कोटी मंजूर

Nashik Currency Note Press
Nashik Currency Note PressTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिकरोड येथे इंडियन सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोटप्रेस असून तेथे अनुक्रमे भारत सरकारचे आवश्‍यक कागदपत्र तसेच चलनी नोटांची छपाई केली जाते. करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईचा वेग वाढावा तसेच दर्जेदार नोटांची छपाई व्हावी, यासाठी अद्ययावत मशिनरी खरेदी करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी अखेर मान्य झाली असून ऑस्ट्रिया व जपान येथून नवीन मशिनरी खरेदी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने मान्यता दिली असून त्यासाठी २०८ कोटी रुपये निधी मंजूरही केला आहे. यामुळे आगामी चार महिन्यांमध्ये नाशिकरोड येथील करन्सी प्रेसमध्ये अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

Nashik Currency Note Press
सुसाट प्रवास; मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार

भारत सरकारच्या प्रमुख प्रेसमधील असलेल्या नाशिक रोड येथील सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोटप्रेस आता भारत सरकारच्या चलन छपाईच्या कामांबरोबरच इतर देशांमधील नोटा छपाईचीही कामे घेत आहेत. नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसने दोन महिन्यांपूर्वी नेपाळच्या एक हजाराच्या ४३० दशलक्ष, तर पन्नासच्या ३०० अशा ७३० दशलक्ष नोटा छपाईचे कंत्राट मिळवण्यात यश आले आहे. याबाबत नुकताच नेपाळबरोबर करार करण्यात आला आहे.

Nashik Currency Note Press
Nashik: जुलै-ऑगस्टमधील संभाव्य टंचाईत टँकरवर होणार 19 कोटींचा खर्च

नेपाळरोबरच भारतीय ५,३०० दशलक्ष नोटा छापण्याचे मोठे कामही प्रेसकडे आहे. या सर्व नोटा एका वर्षात छापून द्यायच्या आहेत. यामुळे नाशिकरोडच्या भारतीय चलार्थ मुद्रणालयात वर्षभरात सहा हजार कोटींपेक्षा अधिक नोटांची छपाई होणार आहे. विशेष म्हणजे चीनलाही स्पर्धेत मागे टाकून नेपाळच्या एक हजाराच्या नोटा छापण्याचे, तर फ्रान्सला मागे टाकून नेपाळच्या पन्नासच्या नोटा छपाईचे काम भारतीय नोटप्रेसला मिळालेले  आहे. याचदृष्टीने काही महिन्यांपूर्वी करन्सी नोट प्रेसला एक यंत्र आले असून एक इन्टॉग्लिओ मशीन व एक नंबरिंग मशीनही बसवण्यात आले आहे.

Nashik Currency Note Press
Nagpur : कचऱ्यातून पालिकेला मिळणार 50 टक्के नफा अन् दरवर्षी 15 लाख

मात्र, नोटप्रेसकडे नोटा छपाईची कामे लक्षात घेऊन आता ऑस्ट्रियामधून चार सुपर सायामल्टन मशीन मागवल्या जाणार आहेत. त्यातील तीन मशिन्स करन्सी नोट प्रेसला, तर एक इंडिया सिक्युरिटी प्रेसला देण्यात येणार आहे. जपानमधून ६० कोटी रुपयांची इन्टग्लिओ मशीन मागवण्यात आली आहे. तसेच ६० कोटी रुपये किमतीची दोन कट ॲण्ड पॅक फिनिशिंग मशीन, तसेच ९० कोटी रुपयांच्या तीन नंबरिंग मशिनची खरेदी केली जाणार आहे. पासपोर्टसाठी आवश्‍यक असलेल्या अत्याधुनिक मशिनसाठी जपान येथील कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे, असे प्रेस कामगार संघटनेतर्फे सांगण्यात आले. य अत्याधुनिक मशिन्स सुलभपणे हाताळता यावी, तसेच त्यामधील बारकावे समजून घेता यावे यासाठी प्रेस कामगारांना प्रथमच संबंधिते त्या त्या  देशांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. या अत्याधुनिक मशिन्समुळे इंडियन सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोटप्रेस यांच्या उत्पादनांचा दर्जा सुधारणार असून त्यामुळे उत्पादन क्षमता वाढणार आहे. यामुळे नाशिकरोड येथील प्रेसमधून रिझर्व्ह बँक आणि सिक्युरिटी प्रिंटिंग डॉक्युमेंट्सच्या प्रेससोबत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्पर्धा करणे सुलभ होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com