नाशिक शहरातील गावठाण होणार 'स्मार्ट'; 'स्काडा'द्वारे 24 तास...

Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरातील गावठाण विकासाचा महत्त्वाचा पार पाडला जाणार आहे. आतापर्यंत पाणी गळतीची ओरड होणाऱ्या गावठाण भागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन स्मार्ट सिटीने केले आहे. यासाठी स्काडा प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. या प्रणालीमुळे पाणी गळती थांबण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याची गुणवत्ता तपासून पाणी वाटपाचे प्रभावी नियोजन होणार असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले. स्काडा प्रणाली पाणी पुरवठा अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जगभर वापरली जाते. (Smart City Nashik)

Nashik
ठेकेदारांनो, नाशिकमध्ये रस्ते खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतच मुदत

नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून गावठाण पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 24 तास पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. योजनेत पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचा पुनर्विकास केला जाणार आहे. पुनर्विकासासाठी मृदा चाचणी व नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आरेखन केले जाणार आहे. अंतिम आरेखन करण्यात आले आहे. मात्र, आरेखनात काही बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने बदल करून पुढील आठवड्यात आरेखन अंतिम केले जाणार आहे. अंतिम आरेखनाची पवई आय आय टी कडून तपासणी केली जाईल.

स्काडा वॉटर मीटर प्रणालीच्या माध्यमातून गावठाणात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होईल. यामुळे पाणी गळती थांबण्याबरोबरच पाण्याची गुणवत्ता तपासणी, पाणीवाटप प्रभावी व अचूक होईल. शहर विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा राहील, असे सुमंत मोरे यांचे म्हणणे आहे.

Nashik
नाशिक ZPचा चांगला निर्णय; रुग्णवाहिकांची संख्या वाढणार, टेंडरही...

११० जलकुंभांचे सर्वेक्षण पूर्ण

स्काडा प्रणालीसाठी डेटा संकलन करण्यासाठी महापालिकेच्या ११० जलकुंभांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. स्काडा प्रणालीत व्यावसायिक पाण्याचे मीटर बसवण्यासाठी साठ ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी मीटर बसविले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com