नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये फ्रान्स येथील हंटिंग या कंपनीने जिंदाल कंपनीसोबत लोखंडी पाईप्स व ट्यूब उत्पादन करणाऱ्या प्रकल्पात २०० कोटींची गुंतवणूक केली आहे. नुकतेच या कारखान्याचे उदघाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे २०० जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार असून या प्रकल्पामुळे भारत प्रथमच ऑइल व गॅससाठी लागणाऱ्या पाईप्स व ट्युब्स उत्पादनात आत्मनिर्भर होऊन निर्यातदारही होणार आहे.
सिन्नर जवळील माळेगाव एमआयडीसीमधील जिंदल कंपनीच्या परिसरात जिंदल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस लि.या स्वतंत्र युनिटचे उदघाटन नुकतेच जिंदल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष पी. आर. जिंदल, हंटिंग पीएलसीचे सीईओ जिम जॉन्सन, व्यवस्थापकीय संचालक डॅनियल टॅन, नीरज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. समुद्रातील तेल आणि गॅसच्या उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिंदल स्टील व फ्रांस येथील हंटिंग यांनी एकत्र येत जिंदाल एनर्जी सर्व्हिसेस (जेएचईएसएल) या कंपनीची स्थापना करीत कंपनीने लोखंडी पाईप्स व ट्यूबसचे उत्पादन सिन्नरच्या जिंदल कंपनीमध्ये सुरु केले आहे. या कंपनीने।माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २००कोटींची गुंतवणूक केली आहे. या स्वतंत्र युनिटमध्ये दरवर्षी ७० हजार मेट्रिक टन पाईपचे उत्पादन होणार आहे. या प्रकारचे पाईप्स व सीमलेस ट्यूब्सचे उत्पादन करणारी ही देशातील पहिली कंपनी असल्याची माहिती जिंदल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष पी. आर. जिंदल यांनी दिली.
यावेळी पी. आर. जिंदल म्हणाले, तेल आणि वायू उद्योगाच्या ओसीटीजी (ऑइल कंट्री ट्युब्युलर गुड्स) क्षेत्रातील उत्पादने आणि सेवामधील या1 उत्पादनामुळे देशातील पाईप्सची गरज पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे या दर्जेदार उत्पादनांची निर्यातही होणार आहे. जिम जॉन्सन म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या समर्थनार्थ, जिंदल एसएडब्ल्यू आणि हंटिंग या दोघांनी इतिहास रचला आहे. हे उत्पादन स्थानिक ऑईल आणि गॅस उद्योगांसाठी फायद्याचे ठरेल आणि भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीसाठी देखील महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॅनियल टॅन म्हणाले, जिंदाल कंपनीच्या शेजारीच या पाईप्सचे उत्पादन सुरू केल्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा प्रश्न सुटणार आहेच. शिवाय मुंबई येथील बंदरातून निर्यातीची सुविधा आहे. यामुळे भारतातील ऑइल व गॅस क्षेत्राची।पाईप्स व ट्युब्स यांची गरज या उत्पादनातून भागवली जाणार आहे. तसेच निर्यातही केली जाणार आहे. यावेळी जिंदल कंपनीतील उच्च अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पातून डिसेंबर २०२३ पासून ऑईल व गॅस काढण्यासाठी उपयोगी ठरणारे पाईप्सचे उत्पादन सुरू होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ७० हजार .मेट्रिक टन पाईप्सचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट असून यात रोबोटिक्सचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. देशविदेशातील ऑईल व गॅस.क्षेत्रातील कंपन्यांकडून आगाऊ बुकिंग झाल्याची यावेळी माहिती देण्यात आली.