Nashik : सिमेंटऐवजी 'हे' वापरून काँक्रिटीकरणाचा पहिला प्रयोग यशस्वी

construction
constructionTendernama
Published on

नाशिक (Nashik) : कारखान्यांमध्ये कच्च्या लोखंडापासून स्टीलचे उत्पादन करताना स्लॅग नावाचा पदार्थ तयार होतो. पर्यावरणदृष्ट्या या स्लॅगची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या असताना काँक्रिटीकरणासाठी सिमेंटऐवजी स्लॅग वापरला जाऊ शकतो, याबाबत संशोधनही झाले होते. या संशोधनाचा पहिला वापर नाशिक येथे झाला असून जवळपास ८० हजार चौरस फूट बांधकामाचे काँक्रिटीकरण सिमेंटऐवजी स्लॅग वापरून केल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. नाशिकमधील या एका प्रयोगाने तब्बल १७६ टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात यश आले आहे.  यामुळे बांधकाम क्षेत्रात पर्यावरणपुरक व स्वस्त बांधकामांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

construction
Eknath Shinde : सायबर सुरक्षेबाबत सरकार खर्च करणार 837 कोटी; ...अशी नोंदवा तक्रार

जगभरात कार्बन उत्सर्जन रोखण्याहेतूने अनेक प्रयोग केले जात आहेत. त्याच अनुषंगाने 'ग्रीन बिल्डिंग'ची संकल्पना सर्वच क्षेत्रात रुजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने या प्रयोगासाठी पुढाकार घेतला आणि शहरातील उद्योजक तथा माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या बेळगाव ढगा येथील जेके वेअरहाऊसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. स्लॅगचा बांधकामात सिमेंटऐवजी वापर होऊ शकतो, याबाबत संशोधन केलेले संशोधक डॉ. रामकुमार नटराजन यांच्या सल्ल्याने वेअरहाऊसच्या ८० हजार स्केअर फूट क्षेत्रावर काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यासाठी तामिळनाडूमधील एका उत्पादक कंपनीने १२ टन कच्चा माल (स्लॅग) पुरवला. स्लॅग, खड़ी व पाणी यांच्या मिश्रणातून काँक्रिटीकरण केले गेले. हे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी नाशिकमध्ये ब्लॉक चाचणीही घेण्यात आली होती. नाशिक येथे ४ सप्टेंबर २०२३ ला कॉक्रिटीकरण झाल्यानंतर ६ दिवसांनी त्याची चाचणी घेण्यात आली. त्यात गुणवत्ता, दर्जा, वजन पेलण्याची क्षमता, काठिण्य हे सिमेंटएवढेच असल्याचे सिद्ध झाले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यानिमित्ताने जगभरात प्रथमच सिमेंटला पर्याय समोर आला आहे. टाटा स्टील व इको मटेरिअल्स यांनी संयुक्तपणे हे मिश्रण तयार केले असून, त्याचे पेटंटदेखील त्यांना प्राप्त झाले आहे.

construction
Nashik : नागरिकांशी चर्चा करून बनणार ‘नमामि गोदा’चा डीपीआर

फ्लाय ऍशप्रमाणे स्लॅगही निरुपयोगी
औष्णिक वीजनिर्मिती करण्यासाठी कोळसा जाळला जातो. त्यातून तयार होणारा फ्लाय ॲश हा पदार्थ निरुपयोगी आहे. तसाच कच्चा लोखंडापासून स्टील उत्पादन करताना स्लॅग हा उपघटक निर्माण होतो. फ्लायॲशच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगासमोरही स्लॅगचे आव्हान आहे. स्टील निर्मिती करताना स्लॅग अर्थात राखेसारखा पदार्थ बाहेर पडत असतो. त्यामुळेच पर्यावरणदृष्ट्यादेखील या स्लॅगच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, या प्रयोगामुळे स्लॅगचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. स्लॅग व सिमेंटचे गुणधर्म सारखेच आहेत. स्लॅगमध्ये काही प्रमाणात ऍक्टिवेटर्स टाकून मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण सिमेंटपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

construction
Nashik : जलजीवनच्या 164 पाणी पुरवठा योजना पूर्ण

बांधकाम खर्च वाचणार
स्लॅगची एक गोणी २०० रुपयाना तर, सिमेंटची गोणी ४०० रुपयांपर्यंत मिळते. म्हणजेच बांधकामात सिमेंटसाठी होणारा ५० टक्के खर्च वाचू शकतो. परिणामी घरांच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून सुरु असलेल्या पूल, रस्ते अशा सार्वजनिक प्रकल्पांत स्लॅग वापरल्यास हजारो कोटी रुपये वाचू शकतील. विशेष म्हणजे स्लॅगचा रंगही सिमेंटसारखाच आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com