CM : निधी खर्चात मुख्यमंत्री प्रथम; उपमुख्यमंत्री 32व्या स्थानावर

Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath ShindeTendernama
Published on

नाशिक (Nashik) : जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांना दिलेल्या निधी खर्चासाठी आता एक आठवडा उरला असून, या वर्षात निधी नियोजनावर तीन महिन्यांच्या स्थगितीचा निधी खर्चावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्याने निधी खर्चात पहिला क्रमांक पटकावला असून, अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नागपूर जिल्हा निधी खर्चात ३२ व्या क्रमांकावर आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
PMC: पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी 'हा' आहे प्लॅन

निधी खर्चात मुंबई उपनगर, पुणे व नाशिक हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांनी निधी खर्चात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक टिकवला असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी राज्यात सगळ्यात शेवटचे म्हणजे ३६ व्या स्थानी असलेल्या नाशिक जिल्ह्याने यंदा पहिल्यापासून निधी खर्चावर विशेष लक्ष केंद्रित करीत निधी खर्चात राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
Nashik ZP: निधी वाटपाचा वाद आता थेट विधीमंडळात

जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांना १३ हजार ३४० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या वर्षात राज्यात जूनमध्ये झालेले सत्तांतर त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेतील निधी नियोजनावर असलेली स्थगिती, राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे निधी नियोजनाबाबत पालकमंत्र्यांना दिलेले अधिकार या सर्वांचा एकत्रित परिणाम निधी खर्चावर झालेला दिसून येत आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
Nashik : विदेशी उद्योजक का पडले वाइन कॅपिटलच्या प्रेमात?

यामुळे आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजनेतील आठ हजार ४६४ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. पुढच्या सहा दिवसांमध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च करण्याचे मोठे आव्हान राज्यातील ३६ जिल्ह्यांसमोर आहे. दरम्यान या निधी खर्चामध्ये ठाणे जिल्ह्याने मंजूर निधीच्या ८६ टक्के निधी खर्च केला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगरने ८५ टक्के निधी आतापर्यंत खर्च केला आहे. यापाठोपाठ पुणे जिल्ह्याने ८१ टक्के व नाशिक जिल्ह्याने ७७ टक्के निधी आतापर्यंत खर्च केला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वाधिक ८७५ कोटी रुपये निधी पुणे जिल्ह्यास दिला असून त्या खालोखाल ८४९ कोटी रुपये निधी मुंबई उपनगर जिल्हयास दिला आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यास ६७८ व ठाणे जिल्ह्यास ६१८ कोटी रुपये निधी दिला आहे. नाशिक जिल्ह्यास ६०० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांना अनुक्रमे ५५७ व ५२७ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
 

Devendra Fadnavis Eknath Shinde
Mumbai : 'हे' आमदार निवास 18 महिन्यांत होणार 'हायटेक'

निधी खर्च करणारे पहिले दहा जिल्हे
ठाणे : पहिला क्रमांक
मुंबई उपनगर : दुसरा क्रमांक
पुणे : तिसरा क्रमांक
नाशिक : चौथा क्रमांक
सोलापूर : पाचवा क्रमांक
जळगाव : सहावा क्रमांक
रायगड : सातवा क्रमांक
सिंधुदुर्ग : आठवा क्रमांक
मुंबई शहर : नववा क्रमांक
धाराशिव : दहावा क्रमांक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com