Chhagan Bhujbal : हिवाळी अधिवेशनातून आली नाशिक जिल्ह्यासाठी गुड न्यूज!

Yeola
YeolaTendernama
Published on

नाशिक (Nashik) : जिल्ह्यातील नाशिक-निफाड-येवला या चौपदरी रस्त्याचे पिंपळस ते येवला दरम्यानच्या ५६ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात ५६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यासाठी प्रयत्न केले. दरम्यान या रस्त्यासाठी आशियाई बँकने निधी दिला आहे. या निर्णयामुळे नाशिक-निफाड-येवला रस्त्याच्या सुधारणेच्या प्रश्न मार्गी लागला आहे.

Yeola
Karjat CSMT via Panvel : पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुसाट; 'हा' आहे मुहूर्त

ज्येष्ठ नेते व विद्यमान अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ २००४ मध्ये येवला मतदार संघातून निवडून आल्यानंतर त्यांनी नाशिक ते येवला या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मंजूर केले होते. त्यावेळी रस्त्याची दुरवस्था झालेली होती. यामुळे नाशिकहून निफाड, येवला व पुढे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी खूप वेळ जात होता.

दरम्यान नाशिक ते येवला या चौपदरी रस्त्याचे काम झाल्यामुळे या मार्गाने वेगाने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना कमीत कमी वेळेत प्रवास करणे शक्य झाले होते. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण झाले होते. मोठ्या प्रमाणात रस्ता नादुरुस्त झाल्याने अनेक अपघात होत होते.

('टेंडरनामा'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yeola
Nashik : यांत्रिकी झाडूंनी पहिल्या दिवशी केली केवळ 12 किमी रस्त्यांवर झाडलोट

वाहतुकीस अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रस्त्याच्या नूतनीकरणासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू होता. त्यातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत या रस्त्याला मंजुरी मिळाली होती. मागील अर्थसंकल्पात या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी ५६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

यामध्ये नाशिक - निफाड – येवला रस्ता १७९ ते २३५ किलोमीटर म्हणजे पिंपळस ते येवला या ५६ किलोमीटरचा समावेश आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर होऊन या रस्त्याच्या सुधारणेच्या कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ५६० कोटी निधीची तरतूद करण्यात आहे. त्यामूळे आता या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com