Nashik : केंद्राच्या 100 ई-बसचा डेपो होणार आडगावला

bus
busTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक शहरासाठी लवकरच पीएम ई बसच्या तब्बल शंभर बसेस मिळ्णार आहेत. या बससाठी डेपो, वीज पुरवठा व्यवस्था याची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पथकाने नुकतीच नाशिक महापालिकेला भेट देऊन पाहणी केली. या पथकाने सिटी लिंक या शहर बस सेवेची माहिती घेतली. तसेच महापालिकेने पीएम-ई बससाठी आडगांवच्या ट्रक टर्मिनल येथे बस डेपोसाठी जागा सुचवली आहे. या जागेची प्रत्यक्ष पाहणी करत महावितरणकडून चार्जिग स्टेशनसाठी विद्युत पुरवठा केला जाईल का याबाबत महावितरणशी चर्चा केली. या  बसेस सुरू करण्यासाठी सकारात्मक बाबी आढळून आल्याने शहरात लवकरच इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहे. 

bus
Aditya Thackeray : निकृष्ट काम करणाऱ्या 'त्या' ठेकेदाराकडे मुंबईतील रस्त्यांची 1 हजार कोटींची कामे कशी काय?

तत्पूर्वी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती घेतली होती. त्यात महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने शहरात बस डेपोसाठी जागा, महावितरणचा वीज पुरवठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा दौरा करण्यात आला. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून पीएम ई-बस सेवा योजना राबवण्यात येत आहे. त्यातून देशातील ४० लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दहा हजार इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार आहेत. पीएम ई बस विभागातील दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी राज्यातील  सर्व महापालिकांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ई बस बाबत चर्चा केली. यावेळी नाशिक महापालिकेने शहरात या बसेससाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.

bus
Nashik : 1384 ग्रामपंचायतींना लॉटरी; जिल्हा परिषद करणार 6.32 कोटी जमा

इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब केल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.  या योजनेच्या माध्यमातून देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ई-बस ऑपरेटर्सशी संबंधित इतर सुविधाही सरकारकडून केल्या जाणार आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या पथकाने नाशिक शहरात पाहणी करून ई बस बाबत पाहणी करून पायाभूत सुविधांची पाहणी केली. यात त्यांनी इलेक्ट्रिक बस साठी चार्जिंग व्यवस्थेबाबत महावितरणच्या।अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

bus
Nashik : वादग्रस्त सफाई ठेक्याला दुसऱ्यांदा मुदतवाढ; टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण

बस खरेदीला ब्रेक 

महापालिकेने एन कॅप अर्थात नॅशनल एअर क्लिन मिशन योजनेअंतर्गत पन्नास बसेससाठी केद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरीही मिळाली होती. पालिकेला एन कॅप अतर्गत २२ कोटींचा निधी हवा शुद्ध करण्यासाठी मिळ्तो. त्या निधीतून या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संबंधित कंपनीकडून वेळेत बस पुरवल्या जात नसल्याच्या कारणामुळे ही इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात आली. आता पीएम ई बस योजनेतून नाशिकला शंभर बसेस मिळ्णार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com