Budget : भुसावळ-इगतपुरी तिसऱ्या रेल्वेलाइनसाठी 1500 कोटी

Railway
RailwayTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नुकत्याच मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget) रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची तरतूद करण्यात आला आहे. रेल्वेने या निधीतून प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे विभागासाठी (Bhusaval Railway Division) नवीन रेल्वेमार्ग, सर्वेक्षण करणे आदी कामांसाठी सुमारे १,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Railway
PM Modi : भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पंतप्रधानांकडून गिफ्ट!

त्यामध्ये इगतपुरी ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणासह देवळालीच्या रेल्वेगेट आणि मनमाड - जळगाव अतिरिक्त रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमााणे देवळाली गेट क्रमांक ९० येथे उड्डाणपुलासाठीही ६.६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी दिली.

Railway
Pune: मोठी बातमी; रिंगरोडच्या कामात पुन्हा नवे विघ्न?

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ विभागातील नवीन सात रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात, इगतपुरी- भुसावळ नवीन तिसरी लाइन ३०८ किलोमीटर, भुसावळ-खंडवा नवीन तिसरी चौथी लाइन १२३ किलोमीटर, औरंगाबाद- भुसावळ नवीन लाइन १६० किलोमीटर, औरंगाबाद- बुलढाणा- खामगाव नवीन लाइन १७० किलोमीटर, भुसावळ-बडनेरा वर्षा नवीन चौथो लाइन ३१३ किलोमीटर, भुसावळ- खंडवा नवीन चौथा मार्ग, आणि मनमाड- जळगाव नवीन चौथी लाइन अंतिम स्थळ निश्चिती सर्व्हे व बांधकामासाठी ५२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यात इंदूर- मनमाड- ३६८ किलोमीटर (दोन कोटी), धुळे-नरडाणा- ५० किलोमीटर (१०० कोटी), पाचोरा-जामनेर- मलकापूर- ८४ किलोमीटर (५०.२० कोटी), भुसावळ- जळगाव तिसरी लाइन (एक कोटी), मनमाड-जळगाव तिसरी लाइन- १६० किलोमीटर (३५० कोटी), जळगाव- भुसावळ चौथी लाइन २५ किलोमीटर (२० कोटी) यांचा समावेश आहे.

Railway
Nashik ZP : काम न करताच काढले रस्त्याचे बिल

उड्डाणपूल आणि रेल्वेगेट होणार
भुसावळ विभागात जळगाव-गेट क्र. १४७ उड्डाणपूल- (१०.१२ कोटी), बडनेरा गेट क्र. ७ उड्डाणपूल - (३ कोटी), नांदुरा गेट क २० उड्डाणपूल- (एख लाख), खंडवा गेट क्र. १६२ उड्डाणपूल- (एख कोटी), देवळाली गेट क्र. ९० उड्डाणपूल (६.६८ कोटी), चांदूर बाजार गेट क्र. ७० उड्डाणपूल- (४.०६ कोटी, कजगाव गेट क्र. १२६ उड्डाणपूल- (५० लाख), रावेर खाल्ले क्र. १७१ उड्डाणपूल- (८.६७ कोटी), निंभोरा गेट क्र. १६९ उड्डाणपूल- (तीन कोटी), भादली गेट' क्र. १४९ उड्डाणपूल- (१५ लाख), अमरावती गेट आणि उड्डाणपूल- (२.७८ कोटी), अमरावती गेट आणि उड्डाणपूल- (२.७७ कोटी). प्रस्तावित करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com