Nashik : 'या' मार्गावर आकारला जातोय समृद्धीच्या चारपट टोल

 ६० किलोमीटरला ३८५ रुपये टोल
Khed Shivapur Toll
Khed Shivapur TollTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक शहर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या खासगी वाहनाने चांदवड येथे जायचे असल्यास केवळ ६० किलोमोटरसाठी ३८५ रुपये टोल द्यावा लागत आहे. राज्यात सध्या सर्वाधिक टोल समृद्धी महामार्गावर आकारला जात असून तेथे चारचाकी खासगी वाहनांना प्रतिकिलोमीटर १.६५रुपये टोल असताना मुंबई आग्रा महामार्गावरून वाहन चालवण्यासाठी प्रतिकिलोमीटरला ६ रुपये टोल भरावा लागत आहे. भर दिवसा नागरिकांची ही लूट असून महामार्ग विकास प्राधिकरण त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात आणून देऊनही आश्वासनापालिकडे काहीही हाती लागत नाही.

Khed Shivapur Toll
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ठाणे ते बोरिवली अवघ्या 10 मिनिटांत

मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक जिल्हयात घोटी, पिंपळगाव बसवंत व चांदवड असे तीन टोलनाके आहेत. ठाणे जिल्ह्यातील पडघेयानंतर जवळपास ६० किलोमीटरवर घोटी येथे टोल नाका असून त्यानंतर पुन्हा ६० किलोमीटरवर पिंपळगाव बसवंत येथे टोल नाका आहे. त्यानंतर केवळ ३५ किलोमीटर अंतरावर चांदवड येथे टोल नाका आहे. मुंबईहुन नाशिकपर्यंत केवळ दोन टोल नाके असल्याने त्याची भर काढण्यासाठी पिंपळगाव व चांदवड येथे न टोलनाक्यावर अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जाते. या महामार्गावरून मुंबईहून प्रवासाला निघालेल्या वाहनांसाठी हे दर योग्य असतीलही, नाशिकहून चांदवड, मनमाड, मालेगाव येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना केवळ ६० किलोमीटरसाठी ३८५ रुपये टोल भरावा लागत आहे. यात पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चारचाकी वाहनाला २२० रुपये व चांदवड टोल नाक्यावर १६५ रुपये टोल आकारला जातो.

Khed Shivapur Toll
BMC : जम्बो कोविड सेंटर टेंडर प्रकरणी आयुक्तही अडचणीत?

पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर नाशिक जिल्हयात प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेल्या म्हणजे एम एच १५ व एम एच ४१ या वाहनांना सवलत असून ४० रुपये टोल आकारण्याची सवलत आहे. मात्र, त्यासाठी पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे वाहनधारकांना त्यांचे वाहन नोंदणी करावी लागते. प्रत्येक वर्षी नवीन नोंदणी करावी लागते. त्यात पिंपळगाव बसवंत व पलीकडचे लोक नियमित ये जा करतात म्हणून ते नोंदणी करतात. मात्र, कधी तरी मालेगाव, चांदवड येथे जाणारे वाहनधारक नोंदणी न करता या महामार्गावरून जातात तेव्हा फास्ट टॅगवरून २२० रुपये टोल आकारला जातो. त्यानंतर चांदवड येथे पुन्हा १६५ रुपये टोल आकारला जातो. नाशिक जिल्ह्यातील वाहनांना पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर ४० रुपये आकारण्याची सवलत असताना त्यासाठी नोंदणीची सक्ती करणे ही वाहनधारकांची उघड उघड लूट आहे. ही लूट थांबत नसल्याने वाहनधारकांमध्ये असंतोषाची भावना वाढीस लागली आहे. नाशिकहून चांदवड केवळ ६० किलोमीटर असून त्यासाठी वाहन धारकांना ३८५रुपये हा देशातील सर्वाधिक टोल मोजावा लागत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी नागरिकांनी स्थानिक वाहनांना असलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे त्रोटक उत्तर दिले. मात्र, वाहन क्रमांक बघून सवलत देण्याऐवजी नोंदणीची सक्ती का, असा वाहन धारकांचा प्रश्न आहे.

Khed Shivapur Toll
Nashik : खासदार गोडसेंचा 376 कोटींचा रोपवे संकटात, कारण...

जड वाहतूक पर्यायी मार्गाने

मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई येथून येणारी वाहने नाशिक येथे आली असता ते छत्रपती संभाजी महाराज मार्गावरून निफाड कडे जातात व तेथून ते चांदवड मार्गे पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर जातात. जडवाहनांना एकेका टोलनाक्यावर हजारो रुपये टोल असल्याने तो वाचवण्यासाठी वाहनधारक अशी वेगळी वाट धरीत आहेत. त्यामुळे तुलनेने कमी रुंदीच्या मार्गावरून जड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. तसेच नांदगाव, मनमाड येथील वाहनांना स्थानिक वाहनांसाठी असलेली सवलत नसल्याने ते चांदवड मार्गे जाण्याचे टाळून लासलगाव, विंचूर मार्गे नाशिकला येत असतात. यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली आहे.

केवळ ६०किलोमीटरसाठी २८५ रुपये टोल आकारणी करणे ही शुद्ध लूट आहे. टोल आकारणी करताना नाशिक जिल्हयातील सर्व खासगी चारचाकी वाहनांना सरसकट व कोणत्याही अटी शर्तीशिवाय सवलत लागू करण्याची गरज आहे.

- ऍड. जालिंदर ताडगे, ज्येष्ठ विधिज्ञ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com