नाशिककरांचा पावसाळा यंदाही खड्ड्यात;40 किमीचे रस्ते अजूनही खोदलेले

Pothole
PotholeTendernama
Published on

नाशिक (Nashik) : शहरात वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदून ते बुजवण्याची मुदत ३१ मे रोजी संपल्यानंतरही शहरातील ४० रस्ते अद्याप बुजवणे बाकी आहे. शहरात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून घरगुती गॅस जोडणीसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मागील पावसाळ्यातही खड्डे खोदण्याचे काम सुरू असल्यामुळे व ते वेळेवर न बुजवल्याने महापालिकेवर मोठी टीका झाली होती. यामुळे महापालिकेने यापुढे रस्ते खोदण्यास परवानगी देताना ते ३१मे पर्यंत पुन्हा बुजवण्याची मुदत देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. मात्र, या कंपनीने महापालिकेच्या धोरणाला फारसी किंमत दिली नसल्याचे दिसत आहे.

Pothole
Mumbai : 2 हजार कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला नव्या जागेची प्रतीक्षा

नाशिक शहरात घरगुती वापराच्या गॅस वाहिनीच्या नावाखाली महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीआणि ऑप्टिकल फायबर केबलसाठी मोबाइल कंपन्यांनी शहरभर रस्ते खोदल्याने दोन वर्षांपासून नाशिककरांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मार्ट सिटीने गावठाण विकास योजनेखाली खोदलेल्या रस्त्याचीही त्यात भर पडली आहे. महापालिकेने शहरातील रस्ते खोदण्याची सर्व कामे १० मेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर रस्त्यावर खड्डे खोदताना आढळल्यास थेट फौजदारीगुन्हा दाखल करण्याचा इशाराच शहर अभियंता वंजारी यांनी दिला होता. मात्र, मुदतीनंतरही शहरात रस्ते खोदण्याचे काम काही ठिकाणी सुरूच होते.

Pothole
Nashik : संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी डीपीसीमधून 30 लाख निधी

महापालिकेने पत्र पाठवण्यापलीकडे काहीही कारवाई केली नाही. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी ३१ मे रोजीची शेवटची मदतही संपुष्टात आली. मात्र, शहरातील बहुतांश खोदलेल्या रस्त्यांचे पुनर्भरण झालेच नसल्याचे दिसत आहे. खोदलेल्या ११३ किमीच्या रस्त्यांपैकी ७३ किमीच्या रस्त्यांचे डब्लूबीएम अर्थातच खडीकरण करण्यात आले. यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर हे खडीकरण खड्ड्यात रूपांतरित होऊन यंदाही नाशिककरांचा प्रवास हा खड्डयातच जाणार असल्याचे चित्र आहे.

Pothole
Nashik : जलजीवन कामांच्या चौकशीशिवाय बिले देऊ नका; कोणी केली मागणी

कंपनीने खोदलेल्या ११३ किलोमीटरपैकी ७३ किमीचे रस्ते दुरुस्त झाले असून खोदलेले रस्ते बुजविताना जलवाहिनी फुटणे, महावितरणची केबल उखडणे अशा अडचणी येत असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. मुळात महापालिकेला कारवाई करायची नव्हती, तर मुदत दिली।कशाला, असा प्रश्न निर्माण होत असून मुदत देणारे।महापालिका आयुक्त यांची बदली झाल्याने नवीन आयुक्त येऊन ते नव्याने मुदत देतील व नागरिकांचा खड्डयातील प्रवास सुरूच राहील, असे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com