Nashik: रस्ते काँक्रिटीकरणासाठी महापालिका कोठून आणणार 2 हजार कोटी?

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजरकर यांनी नाशिक शहरातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या जाचातून मुक्त होण्यासाठी यापुढे शहरातील सर्व रस्ते काँक्रिटचे करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. या धोरणानुसार शहरात जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी किमान दोन हजार कोटी रुपये खर्च येणार असून महापालिकेची सध्याची परिस्थिती बघता अंदाजपत्रकातून तरतूद केल्यास या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पुढचे दहा लागू शकतील. यामुळे सिंहस्थ कुंभमेळा निधीतून सरकारकडून वाढीव निधी आणल्यास सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण होऊ शकते, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

Nashik Municipal Corporation
Exclusive: शाळेच्या आरक्षित भूखंडावर उभारलेले व्यापारी संकुल वादात

नाशिक महापालिका हद्दीत २,३०० किलोमीटर लांबीचे रस्ते असून, त्यात १,६२२ किलोमीटरचे रस्ते डांबरी आहेत. २५४ किलोमीटरचे रस्ते खडीचे असून, २८९ रस्ते काँक्रीटचे, तर १२८ रस्ते झोपडपट्टी भागातील आहेत. शहरातील खड्डेमुक्तीसाठी नूतन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी यापुढे शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणा करण्याऐवजी काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यास बरीच वर्षे लागणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. या रस्त्यांचे काम करण्यासाठी सिंहस्थ निधीचा उपयोग केला जाऊ शकतो, असे बांधकाम विभागाचे म्हणणष आहे. शहरातील १,६२२ किलोमीटरच्या डांबरी स्त्यांचे काँक्रिटीकरण करायचे झाल्यास जवळपास दोन ते अडीच हजार कोटींचा खर्च येणार आहे. सिंहस्थ निधीतून काही तरतून केल्यास पुढीच्या तीन-चार वर्षांमध्ये महत्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होऊ शकते व उर्वरित रस्त्यांची कामे महापालिकेच्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार पुढचे काही वर्षे केले जाऊ शकते.

Nashik Municipal Corporation
Nashik: अखेर नव्या आयुक्तांनी निर्णय घेतलाच; 'या' प्रकल्पांचे...

किलोमीटरला साडेचार कोटींचा खर्च?

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बांधकाम विभागाचा आढावा घेतल्यानंतर खड्डेमय रस्त्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते टप्प्याटप्प्याने काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खड्डे पडू नयेत यासाठी रस्ते 'पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रीट या नव्या तंत्रज्ञानानुसार करण्याबाबतही चर्चा झाली. मात्र, या तंत्रज्ञानानुसार रस्ते करण्यासाठी प्रत्येक किलोमीटरला साडेचार कोटी रुपयांचा खर्च आहे. यामुळे आयुक्तांच्या संकल्पनेतील रस्ते सध्याच्या परिस्थितीत उभारणे अवघड दिसत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com