Nashik : नांदगावसाठी 53 कोटींची नवी पाणीपुरवठा योजना; 56 खेडी योजनेतून होणार सुटका

Water
WaterTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नांदगावसह ५६ खेडी पाणी पुरवठा योजनेतून अनेक वर्षांपासून  नांदगाव शहराला विस्कळित स्वरुपाचा पाणी पुरवठा होत असतो. मात्र, आता नगरोत्थान योजनेतून नांदगाव शहरासाठी ५३ कोटींच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून पुढील अठरा महिन्यांत ही योजना पूर्ण होणार आहे. यामुळे नांदगाव शहरातील रहिवाशांची दहा-बारा दिवसांनी होत असलेल्या विस्कळित पाणी पुरवठ्यातून मुक्तता होऊन गिरणा धरणातून रोज माणसी १३४ लिटर पाणी मिळणार आहे.

Water
Ajit Pawar : मोदींचे ते स्वप्न आम्ही पूर्ण करणारच! असे का म्हणाले अजित पवार?

नांदगाव तालुक्यातील ५६ गावांसह नांदगाव नगरपालिकेसाठी ५६ खेडी पाणी पुरवठा योजना राबवली जाते. ही पाणी पुरवठा योजना जुनी झाली असल्याने एकाच वेळी सर्व गावांना पाणी पुरवठा करता येत नाही. यामुळे या योजनेव अवलंबून असलेल्या सर्व गावांसह नांदगाव शहरातही वर्षभर पाणीपुरवठा विस्कळित असतो. या योजनेचे व्यवस्थापन नाशिक जिल्हा परिषदेकडून केले जाते. मात्र, वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पाणीपट्टी वसुलीही वेळेत होत नसते. परिणामी पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कायम तगादा लावला जातो. यामुळे पाणी कमी म्हणून पाणीपट्टी वसुली नाही व पाणीपट्टी मिळत नाही म्हणून योजनेकडे दुर्लक्ष, अशा पेचात येथील पाण्याचा प्रश्न सापडला असताना नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी नगरोत्थान योजनेतून गिरणा धरणातून नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर केली आहे. या योजनेची टेंड प्रक्रिया पूर्ण झाली असून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अखेर मुहुर्त लागला आहे. मधून गिरणा धरणातून नांदगाव शहरासाठी समांतर नळपाणीपुरवठा योजनेला अखेर मुहर्त लागला. ५३ कोटींच्या योजनेसाठी मुंबईतील आर. अॅन्ड बी. इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंपनीने या योजनेचे काम १८ महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे.

Water
Nashik : अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांतून सिन्नर मतदारसंघाला 131 कोटी

मनमाड शहरासाठी करंजवण धरणातून थेट पाणीपुरवठा योजना व ७८ खेडी योजना निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनमाडला आले असता आमदार कांदे यांनी नांदगाव शहराला गिरणा धरणातून समांतर पाणीपुरवठा योजनेची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही योजनेची घोषणा केल्यानंतर आता प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये
-
 गिरणा धरणातून शहरवासीयांसाठी रोज  दरडोई दरमाणशी १३५ लिटर पाणी मिळणार
गिरणा धरणात नांदगाव शहराची २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहित धरून पाणी उपलब्धता मंजूर
- गिरणा धरण ते नांदगाव शहरपर्यंत साडेअठ्ठावीस किलोमीटर अशी मुख्य जलवाहिनी टाकली जाणार
- शहरातील पाणी वितरण व्यवस्थेसाठी जुन्या योजनेतील जलवाहिन्या बदलून नवीन ३६ किलोमीटरचे जलवाहिन्यांचे जाळे टाकणार
-  २९ किलोमीटर लांबीच्या नव्या अशा ३५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com