नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

Nashik Airport
Nashik AirportTendernama
Published on

नाशिक (Nashik) : 2022 हे वर्ष संपताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना नाशिककरांना एकाचवेळी दोन गुड न्यूज मिळाल्या आहेत. आता नाशिककरांना आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही.

Nashik Airport
मोठी बातमी : गायरानातील अतिक्रमणांवरील कारवाई जानेवारीपर्यंत टळली

नाशिककरांना विमानसेवेबाबत एकाच वेळेस दोन गुड न्यूज मिळाल्या आहेत. स्पाइस जेट आणि इंडिगो कंपनीने नवीन वर्षांत नाशिकहून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात गोवा, अहमदाबाद, नागपूर, बंगळूरचा समावेश आहे. सध्यस्थितीत नाशिक-हैदराबाद आणि नाशिक- नवी दिल्ली अशी स्पाइस जेटची विमानसेवा सुरू आहे. इंडिगोने नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik Airport
मोठी बातमी : गायरानातील अतिक्रमणांवरील कारवाई जानेवारीपर्यंत टळली

याशिवाय अनेक वर्षांपासून मागणी असलेली आंतररष्ट्रीय विमान सेवा लवकरच नाशिकच्या ओझर विमानतळावरून सुरू होणार आहे. ओझर येथील नाशिक विमानतळावर इमिग्रेशन सुविधा पूर्ण झाली असून त्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता नाशिक हे खऱ्या अर्थानि आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात नाशिक विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणार असल्याचे हे संकेत आहेत.

Nashik Airport
कल्याण बाह्यवळण रस्ता; कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीबाबत मोठी अपडेट

नाशिकच्या ओझर विमानतळाचे व्यवस्थापन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडे आहे. राज्य सरकार आणि एचएएल यांनी संयुक्त पद्धतीने नाशिक विमानसेवेला वेग दिला आहे. या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑपरेशन्स हाताळण्यासाठी एचएएलने २ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मंजुरीनंतर ओझर विमानतळावर चेकपॉईंटसाठी इमिग्रेशनसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर नोव्हेंबर २०२० मध्ये काम सुरू झाले. आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन आणि निर्गमन, सीमाशुल्क कार्यालय, इमिग्रेशन काउंटर इत्यादी सुविधा उभारण्यासाठी मुंबई इमिग्रेशन ब्युरोने मार्गदर्शन केले. यामुळे एचएएलने विमानतळावर आता देशांतर्गत विमान सेवा आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा असे स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. या दोन्ही विभागांवर स्वतंत्रपणे प्रवेश आणि निर्गमन विभाग तयार केले आहेत. या पायाभूत सुविधांची पाहणी करून त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्यताही दिली आहे.

Nashik Airport
घरकुल परत जाऊ नये म्हणून 'या' ग्रामपंचायतीने काय केले पाहा

तिकीट बुकिंग सुरू
स्पाइस जेट आणि इंडिगो कंपनीने नवीन वर्षांत नाशिकहून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात गोवा, अहमदाबाद, नागपूर, बंगळूरचा समावेश आहे. इंडिगोच्या विमानसेवेची नाशिककरांना तीन वर्षांपासून प्रतिक्षा होती. सध्यस्थितीत नाशिक-हैदराबाद आणि नाशिक- नवी दिल्ली अशी स्पाइस जेटची विमानसेवा सुरू आहे. इंडिगोने नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik Airport
2 हजार ST बस खरेदीसाठी टेंडर तर १७० नवीन चार्जिंग स्टेशन्स...

स्पाइस जेटने आणखी तीन शहरांसाठी विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बंगळूर, अहमदाबाद, गोव्याचा समावेश आहे. विमानसेवा सुरू करण्यासंबंधीचे पत्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझरच्या एच. ए. एल. विमानतळ प्रशासनाला पाठवले आहे. एच.ए.एल.तर्फे गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा वाढवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. त्यास अखेर यश आल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. विमान कंपन्यांनी नाशिकसाठी २६ मार्च ते २८ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत विमानसेवा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. या विमानसेवांसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com