पुणेकरांची दिवाळी वाहतूक कोंडीतच जाणार का?

Traffic Jam
Traffic JamTendernama
Published on

पुणे : जोरदार पाऊस एकीकडे पुण्याला झोडपून काढत असतानाच पुण्यातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. पुणेकरांची यंदाची दिवाळी बहुतेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत अडकून पडण्यातच जाणार की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अखेर पुणे महानगरपालिकेला दया आली असून, पुणेकरांची कोंडीतून सुटका करा असे साकडे पत्राद्वारे वाहतूक पोलिसांना घातले आहे. (Pune City Traffic Problem)

Traffic Jam
नागपूर रेल्वे स्थानक पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; 487 कोटीचा निधी...

पुणे शहरात गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक अडकून पडत आहेतच, पण पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक, शहरात घुसणारे अवजड वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने यात आणखी भर पडत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने थेट वाहतूक उपायुक्तांना पत्र पाठवून वाहतूक कोंडीच्या अशा वाहनांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

Traffic Jam
छगन भुजबळांचा एल्गार! ...तर 1 नोव्हेंबरपासून टोल बंद आंदोलन!

गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती भागातून मिक्सर, डंपर, मोठे ट्रक बिनधास्त फिरत आहेत. खरे तर शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

Traffic Jam
Pune: खमका अधिकारी मिळाल्याने PMPची सेवा सुधारणार का?

अनेक ठिकाणी नो पार्किंगचा फलक लावून गाड्या लावण्यास बंदी घातली आहे, तरीही पोलिसांच्या कारवाईला न घाबरता नागरिक गाड्या लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, पाऊस आणि मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक मंदावलेली आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून थेट पादचारी मार्ग व रस्त्यावर पथाऱ्या थाटल्या जात आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

Traffic Jam
मुंबई-पुणे मार्गावर लवकरच नव्याकोऱ्या १०० 'ई-शिवाई' धावणार

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी होत असताना गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतूक बंदी असणारे वाहने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तसेच रिक्षा, बसेस हे त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त थांबून कोंडीत भर घालत आहेत. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, बस, रिक्षा योग्य त्या ठिकाणी थांबतील याचे नियोजन करावे अशी विनंती महापालिकेने वाहतूक पोलिसांना केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com