Pune शहरात का वाढलाय रस्ते अपघातांचा धोका?

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरात (Pune City) विमा नसलेली वाहने सुसाट धावत असून, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वायुवेग पथकांकडून अशा सुमारे सहा हजार वाहनांवर कारवाई केली आहे.

Pune
MHADA: यंदा 12 हजार घरांसाठी 5,800 कोटींची तरतूद

अनेक वाहनधारक थर्ड पार्टी विमा देखील काढण्यास टाळाटाळ करीत आहे. या वर्षात आरटीओच्या वायुवेग पथकाने सुमारे २० हजार ४८२ वाहनांवर कारवाई केली असून, यात सर्वाधिक संख्या ही वाहनावर विमा नसल्याप्रकरणी झाली आहे. या कारवाईतून सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यात पाच कोटींची भर पडली आहे.

रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरटीओ प्रशासनाने वायुवेग पथकाची स्थापना करून पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरून, तसेच अन्य मार्गावरून धावणाऱ्या वाहनांवर कारवाईचे सत्र सुरू केले. १ एप्रिल २२ ते ३१ मार्च २३ या कालावधीत ही कारवाई केली आहे. त्यामुळे विशेषतः द्रुतगती मार्गावरच्या अपघाताचे प्रमाण कमी झाला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Pune
बीड बायपासवरील देवळाई चौकातील उड्डाणपुलाखाली खोदकामाचे रहस्य काय?

विविध नियमांचे उल्लंघन
पुणे आरटीओच्या वायुवेग पथकांकडून मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस हायवे, पुणे-बंगळूर, पुणे-अहमदनगर, पुणे-नाशिक व पुणे - सोलापूर महामार्गावर आणि शहरातील अपघातांचे हॉटस्पॉट ठरणाऱ्या मार्गांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. पुणे आरटीओकडून हेल्मेट न घालणे, सिट बेल्ट न लावणे, वाहन चालविताना फोनवर बोलणे, सिग्नल मोडणे, ओव्हरलोड अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारवाई केली आहे.

Pune
Nashik : सॅमसोनाइट कंपनीची विस्ताराची घोषणा; 200 कोटींची गुंतवणूक

...अशी झाली कारवाई

हेल्मेट - ३६९३
सिटबेल्ट - १९४९
मोबाईल फोनचा वापर - ११९९
विमा नसणे - ५९०३
सिग्नल मोडणे/लेन कटिंग - २०६९
अवैध प्रवासी वाहतूक - २३
ओव्हरलोड - ११०२
दिव्याविना वाहन चालवणे - ४४९१
इतर कारवाई - ५३

एकूण - २०, ४८२

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com