गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत सरकारने काय घेतला निर्णय?

Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पुढील महिन्यात होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. या निवडणुका ३१ डिसेंबर २०२४ च्या पुढे ढकलण्यात आल्या असून सहकार विभागाने सोमवारी यासंदर्भातील आदेश जारी केला. मात्र, या निर्णयातून २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा संस्थांना वगळण्यात आले आहे.

Mantralaya
APMC : राज्य सराकराने दिली बाजार समित्यांना गुड न्यूज; 'तो' महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या अहवालानुसार सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील २९ हजार ४२९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी सात हजार १०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यात अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Mantralaya
Pune : 'या' उड्डाणपुलावर अपघातांची मालिका; काय आहे कारण?

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सहकार विभागाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. याआधी जून २०२४ मध्ये पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतरच म्हणजे पुढील वर्षी सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडू शकतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com