Railway: देशातील दुसऱ्या सर्वांत मोठ्या बोगद्यातून धावली वंदे भारत

Mumbai - Solapur दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची नुकतीच बोरघाटात चाचणी यशस्वी
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressTendernama
Published on

पुणे (Pune) : आतापर्यंत लाखो किलोमीटर रेल्वे चालवली. वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) चालविण्याचे प्रशिक्षणदेखील घेतले. मात्र चाचणीचा दिवस वेगळाच होता. गाडी सुसाट तर होतीच; शिवाय बोरघाटात (Borghat) गाडी चालविण्याचे आव्हान देखील होते. देशातील सर्वांत जास्त चढण व तीव्र उतार असलेला हा बोर घाट. जिथे ब्रेकवरून हात जरी सेंकदासाठी बाजूला काढला, तर गाडी वेगाने मागे येते. अशा बोर घाटात पहिल्यांदाच विना ‘बँकर’ (मागून लावलेले इंजिन) वंदे भारतने सुसाट चढण पार केली... असा थरारक तितकाच विलक्षण अनुभव ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे सारथ्य केलेले पुण्याचे (Pune) रेल्वेचालक रणधीर गायकवाड व गुलाबसिंह जाठव यांनी सांगितला.

Vande Bharat Express
Mumbai : मोठी बातमी; घर खरेदीचा विचार असेल तर 'ही' बातमी वाचाच

मुंबई-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची नुकतीच बोर घाटात चाचणी झाली. पुणे रेल्वे विभागाचे चालक गायकवाड व गुलाबसिंह जाठव यांनी ही चाचणी यशस्वी केली. या दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मुख्य लोको (इंजिन) निरीक्षक नरेश कुमार व सी. आर. कळसे हे उपस्थित होते.

Vande Bharat Express
Irrigation Project : विदर्भातील 21 सिंचन प्रकल्प लवकरच होणार पूर्ण

कसा आहे बोर घाट
मुंबई-पुणे लोहमार्गावर कर्जत-लोणावळा सेक्शनमध्ये बोर घाट लागतो. मुंबईहून पुण्याला येताना चढण आहे, तर पुण्याहून-मुंबईला जाताना तीव्र उतार आहे. हा २८ किमीचा भाग आहे. यात ५२ बोगदे आहेत. देशातील सर्वांत जास्त चढण व तीव्र उतार असलेला हा मार्ग आहे. खंडाळा-मंकीहिल दरम्यान २.७ किमीचा देशातील सद्यःस्थितीतला दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा बोगदा आहे. कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी हा बोगदा देशातील पहिल्या क्रमांकाच्या लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जात होता. या बोगद्याचे दुसरे वैशिष्ट असे की हा इंग्रजीतील ‘एस’ शब्दाच्या आकाराचा आहे.

Vande Bharat Express
Nitin Gadkari : देशात पहिली ब्रॉडगेज मेट्रो या शहरांदरम्यान धावणार

कशी आहे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’
१. गाडीची ताशी १६० किमी वेगाने धावण्याची क्षमता
२. ५४ सेकंदांत ताशी १३० किमी वेग घेण्याची क्षमता
३. प्रत्येक डब्यात छोटी पॅन्ट्री कार
४. डब्याचे स्वयंचलित दरवाजे
५. ३२ ट्रॅक्शन मोटर, अन्य रेल्वेला ६ ट्रॅक्शन मोटर. त्यामुळे गाडीचा वेग अधिक.
६. प्रत्येक डब्यात आपत्कालीन परिस्थितीत चालक व गार्डशी बोलण्यासाठी आत्पकालीन बटण
७. ‘कवच’ या सुरक्षा प्रणालीचा अंतर्भाव, त्यामुळे रेल्वेचा समोरासमोर अपघात होणार नाही. रेल्वे एकमेकासमोर येण्यापूर्वी ३ किमीला आधीच थांबते.
८. चालकांना कॅब (इंजिनचा पुढचा भाग) मधून १८० डिग्री प्रमाणात दृश्य दिसते.
९. इंजिन समोर, प्रत्येक डब्यात, दरवाज्यावर सीसीटीव्ही कॅमेरे

Vande Bharat Express
MHADA : खूशखबर! मार्चमध्ये मुंबईतील 4 हजार घरांची सोडत

वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यासाठी पुणे विभागाच्या सहा चालकांना गाझियाबाद येथे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र बोर घाटात रेल्वे चालविणे अत्यंत आव्हानात्मक आहे. पुणे विभागाच्या चालकाने यशस्वीरीत्या ती जबाबदारी पार पाडली. पुणे विभागासाठी ही गौरवशाली बाब आहे.
- ज्वेल मॅकेन्झी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक, पुणे रेल्वे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com