Pune : 'या' तीन उन्नत मार्गांचे टेंडर निघाल्याने तळेगाव-चाकण-शिक्रापूरमधील नागरिकांमध्ये आनंद

Bypass Road
Bypass RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : तळेगाव-चाकण-शिक्रापूर ५४८-डी या राष्ट्रीय महामार्गासह पुणे ते शिरूर आणि नाशिक फाटा ते खेड या तीन उन्नत महामार्गाचे टेंडर पटलावर झळकले आहेत. वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे प्रलंबित महामार्गाच्या कामास अखेर मुहूर्त लागला आहे. काम लवकरच सुरु होण्याच्या आशेने तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गालगतच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Bypass Road
Mumbai Metro-3 : कोर्ट-कचेरीमुळे भुयारी मेट्रोच्या खर्चात तब्बल 5 हजार कोटींची वाढ

पाच वर्षांपूर्वी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता ५४८ डी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर कोटींच्या निधीच्या कागदी घोषणा झाल्या. मात्र, गतवर्षीपासून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्रयस्थ सल्लागार संस्थेमार्फत महामार्गाचे सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्राधिकरणाने तत्परता दाखवत गेल्या २१ डिसेंबरला या महामार्गाच्या कामासाठी टेंडर प्रक्रियादेखील सुरु केली आहे. अस्तित्वातील तळेगाव-चाकण टप्प्यातील २५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्त्वावर चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,४५५.७८ कोटी रुपयांची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. तसेच चाकण ते शिक्रापूर टप्प्यातील २८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,७७८.५३ कोटी रुपयांचे टेंडर देखील प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.

Bypass Road
Pune : परस्पर रस्ते खोदाईला ब्रेक; अतिरिक्त आयुक्तांची परवानगी घेणे अनिवार्य

‘‘कित्येक वर्षे रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरु केल्याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आम्ही आभार मानतो. श्रेयवादात न पडता संबंधित राजकीय मंडळींनी प्रत्यक्ष काम कसे सुरु करता येतील यासाठी पाठपुरावा करावा.’’
- नितीन गाडे, अध्यक्ष, तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती

‘‘प्रकल्पाचे टेंडर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वेबसाइटवर २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ठरलेल्या मानक कार्य पद्‍धतीनुसार पात्र कंत्राटदारास प्रकल्पाचा कार्यादेश प्रदान करण्यात येईल.’’
- अनिकेत यादव, तांत्रिक व्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com