पुणे (Pune) : पुणे शहरासह ग्रामीण भागातही अनधिकृत होर्डिंगमध्ये बेसुमार वाढ झाली असून, १० तालुक्यांमध्ये मिळून केवळ २७ अधिकृत आहेत, तर १ हजार ३७० अनधिकृत होर्डिंग आहेत. तसेच ८७ होर्डिंग धोकादायक असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंगवरून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचा चौक, रस्ता बघून मोकळ्या जागेसह इमारतीवर २ ते ३ टन असे अवजड होर्डिंग उभारले आहेत. काही दिवसापूर्वी वादळात अनधिकृत होर्डिंग कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला होती. तरीही प्रशासन व व्यावसायिक यांचे डोळे उघडलेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील होर्डिंगचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ४४० होर्डिंग आहेत. त्यापैकी आंबेगाव १, बारामती २१, मुळशी ५ या तीन तालुक्यांतच एकूण २७ होर्डिंग अधिकृत आहेत. उर्वरित सर्व होर्डिंग अनधिकृत आहेत. त्यांच्यापैकी केवळ २३ चे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. १ हजार २३० होर्डिंचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. ८७ होर्डिंग धोकादायक असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
तालुका.....अनधिकृत होर्डिंगची संख्या
आंबेगाव - २६
बारामती - १७७
भोर - १०३
दौंड - ६०
जुन्नर - ४३
खेड - २२०
मावळ- १७६
मुळशी - ३७७
पुरंदर - ९७
शिरूर - १३४