पुणे (Pune) : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागात मिरज-लोंढा स्थानक दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने २२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सहा रेल्वे रद्द केले आहे; तर दोन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वेत हुबळी-मिरज, मिरज-लोंढा-मिरज, मिरज-कॅसल रॉक-मिरज एक्स्प्रेस, तसेच २२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान मिरज-हुबळी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. तर २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस ही आपल्या निर्धारित मार्गाने न धावता मडगाव-माजोर्डा- मदुरै-रोहा-पनवेल-कर्जत-लोणावळा या मार्गाने धावेल. हजरत निजामुद्दीन-मैसूर एक्सप्रेसचाही मार्ग बदलला असून ही रेल्वे गाडी पुणे-दौंड-सोलापूर-होटगी-गदग-हुबळी आदी मार्गाने धावणार आहे.