पुणे स्टेशनची गर्दी कमी होणार; हडपसरला आता रेल्वे टर्मिनल

Hadapsar Railway Station
Hadapsar Railway StationTendernama
Published on

पुणे (Pune) : रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गती-शक्ती युनिटची स्थापना करण्यात आली. हेच युनिट आता हडपसर टर्मिनलचा विकास करणार आहे. हडपसर टर्मिनलसाठी १७ कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे. शिवाय दोन स्टेबलिंग लाइनसाठी भूसंपादनाचा विषय देखील मार्गी लागत आहे.

Hadapsar Railway Station
ग्रामपंचायतींना विना ई-टेंडर काम करण्याची मर्यादा पंधरा लाख रुपये

रेल्वे सुधारित दराने जमीन घेण्यास तयार झाली असून त्याचा प्रस्ताव देखील रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला. त्यामुळे भूसंपादनातला अडथळा दूर होण्याच्या मार्गावर आहे. स्थानकाचा परिसर मोठा करण्यात येत असून त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर व आरपीएफ पोलिस ठाण्याची इमारत पाडण्यात येणार आहे. ती इमारत खाली करण्यात यावी, अशी नोटीस देखील बांधकाम विभागाने दिली आहे. येत्या काही दिवसांत याचे पाडकाम देखील सुरू होईल.

Hadapsar Railway Station
जिल्हाधिकाऱ्यांच्या सिंगमफेम कारवाईनंतर अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ

पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानकाला टर्मिनलचा दर्जा देऊन तिथे विकास करण्याचा निर्णय घेतला. अपुऱ्या सुविधेत देखील रेल्वे बोर्डाच्या दबावामुळे हडपसर-हैदराबाद रेल्वे सुरू झाली. आता मात्र सुमारे १७ कोटींचा निधी प्राप्त झाल्याने प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे काम रेल्वे प्रशासन करणार आहे. त्यामुळे हडपसर स्थानकाचा विकास होणार आहे. सुमारे ४० कामे या टर्मिनलवर होणार आहे.

Hadapsar Railway Station
गायरानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी जुन्या नोंदींची तपासणी सुरू

हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी १७ कोटी उपलब्ध झाले आहे. यातून प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा स्थानकावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. शिवाय भूसंपादनाचा प्रश्न देखील बऱ्याच अंशी मिटला आहे. त्यामुळे तोही मोठा अडसर दूर होत आहे.
- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे विभाग, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com