Pune : टेंडरच्या माध्यमातून पुनर्वसन होणारा 'हा' ठरणार शहरातील पहिलाच प्रकल्प

SRA
SRATendernama
Published on

पुणे (Pune) : लक्ष्मीनगरचे पुनर्वसन टेंडरच्या माध्यमातून होणार आहे. टेंडरच्या माध्यमातून पुनर्वसन होणारा हा शहरातील पहिलाच प्रकल्प ठरेल. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पुणे शहरातील शासकीय जागांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन टेंडर मागवून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास विकसकांचा प्रतिसाद मिळत आहे.

SRA
Mumbai Metro 1 : अनिल अंबानींना झटका; 'तो' निर्णय अखेर रद्द, MMRDA चे वाचणार 650 कोटी

पुनर्वसन योजनेला गती देण्याचा ‘एसआरए’चा उद्देश आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी २००५ मध्ये राज्य सरकारने ‘एसआरए’ची स्थापन केली. या प्राधिकरणाने २००८ मध्ये पुनर्वसन प्रकल्पासाठी नियमावली तयार केली. २०१५ मध्ये मात्र तत्कालीन आघाडी सरकारने अशा प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या ‘एफएसआय’मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्पांचे काम ठप्प पडले होते. सत्ताबदल होऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर प्राधिकरणाच्या नियमावलीत बदल अपेक्षित होते, परंतु तत्कालीन अशा प्रकल्पांसाठी नवा फॉर्म्युला वापरून बांधकामास परवानगी देण्याचे आदेश निघाले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या योजना अडचणीत आल्या. या पार्श्‍वभूमीवर प्राधिकरणाने राज्य सरकारकडे सुधारित नियमावली मंजुरीसाठी पाठविली होती. राज्य सरकारने २०२२ मध्ये यास अंतिम मान्यता दिली. यानुसार टेंडर मागवून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे अधिकार प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. या तरतुदीचा प्रथमच वापर करीत प्राधिकरणाने पुणे शहरातील पाटील इस्टेट आणि लक्ष्मीनगर येथील अशा दोन झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदा ‘डीबीओटी’ (डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्स्फर) तत्त्वावर मागविल्या होत्या. त्यापैकी पर्वतीमधील लक्ष्मीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे टेंडर मान्य करण्यात आली असून, विकसकाला आचारसंहितेपूर्वी काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असे प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले.

SRA
Mumbai Metro 1 : अनिल अंबानींना झटका; 'तो' निर्णय अखेर रद्द, MMRDA चे वाचणार 650 कोटी

कामाला गती अपेक्षित

पुणे शहरात ४८६, तर पिंपरी-चिंचवड शहरात ७१ झोपडपट्ट्या आहेत. या दोन्ही शहरांत मिळून सुमारे दहा लाखांहून अधिक झोपडीधारकांची संख्या आहे. गेल्या पंधरा वर्षांत केवळ ८ हजार ३४३ झोपडीधारकांचे पुनर्वसन झाले आहे. एकूण झोपडीधारकांची संख्या विचारात घेतल्यानंतर अवघ्या चार टक्के झोपडीधारकांचे पुनर्वसन आतापर्यंत झाले आहे. सुधारित नियमावलीतील टेंडर प्रक्रियेमुळे आता पुनर्वसनाच्या कामाला गती येईल, असे अपेक्षित धरले जात आहे.

एकूण झोपड्या ४५०

लक्ष्मीनगरची जागा सुमारे दोन एकर असून तेथे ४५० झोपड्या आहेत. ही जागा ‘म्हाडा’रची आहे. पहिल्या टप्प्यात या जागेसह पाटील इस्टेट अशा दोन्ही जागांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याकरिता प्राधिकरणाकडून टेंडर राबविण्यात आली होती. त्यामध्ये लक्ष्मीनगरमधील टेंडर मान्य करून पुनर्वसनाचे काम प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com