मोठी बातमी! पुणे महापालिकेत 300 जागांची भरती; जानेवारीत जाहिरात

Job
JobTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) ४४८ जागांची भरती प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आलेली असताना आता २०२३ मध्ये ३०० जागांची भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये डॉक्टर, आरोग्य निरीक्षक, विद्युत अभियंता यासह अग्निशामक दलातील पदांचा समावेश असणार आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाईल, असे आयुक्त आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.

Job
नाशिक मनपातील 'या' 2 विभागांत तब्बल 706 जागांची मोठी भरती

पुणे महापालिकेमध्ये १० वर्षे पदभरती झालेली नसल्याने अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजाचे व्यवस्थापन करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्य सरकारने गेल्यावर्षी भरती प्रक्रियेवरील बंदी उठल्यानंतर रोस्टर तपासून घेऊन भरतीची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, विधी सहाय्यक अधिकारी या पदांच्या ४४८ जागा भरण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन परीक्षा व त्यानंतर थेट कागदपत्र पडताळणी करून ही भरती प्रक्रिया करण्यात आली. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाच्या म्हाडा, आरोग्य सेवा भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याने शासकीय भरती वादात सापडली होती. पण महापालिकेच्या या प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी काळजी घेण्यात आली. ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात नवीन भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी बिंदूनामावली (रोस्टर) तपासणी सुरू केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोस्टर तपासणी पूर्ण करून १० जानेवारीपर्यंत ३०० जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

Job
महाराष्ट्राच्या 'लाइफलाइन'चा हा लक्झरिअस लूक पाहिलात का?

समाविष्ट गावांमध्ये मनुष्यबळ आवश्‍यक
महापालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तेथील ग्राम पंचायतीमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले. परंतु ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांमध्ये अभियंते, डॉक्टर, अतिक्रमण निरीक्षक पदे नसल्याने त्याचा ताण महापालिकेच्या यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे ही पदे भरली जाणार आहेत. त्यादृष्टीकोनातून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने पदभरती केली तरी अंदाजपत्रकाच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक खर्च हा वेतनावर खर्च होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे कुमार यांनी सांगितले.

Job
औरंगाबाद : 'त्या' पुलाचे सदोष डिझाइन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

क्रिडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त किशोर शिंदे आणि अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त युनूस पठाण यांना बढती देऊन उपायुक्तपदी नियुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पदोन्नती करण्याचा निर्णय आज डीपीसीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. लवकरच स्थायी समितीच्या माध्यमातून यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे कुमार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com