Pune : 'त्या' 15 आदर्श रस्त्यांमुळे पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार का?

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या ‘आदर्श रस्ते’ उपक्रमांतर्गत १५ रस्त्यांवरील विविध प्रकारची कामे २० टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाली आहेत. नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) व बाणेर रस्ता या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमणे, ओव्हरहेड वाहिन्या, राडारोडा काढून पदपथ दुरुस्तीसह बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १३ रस्त्यांची कामे सध्या वेगात सुरू आहेत.

Pune
Nashik : जलजीवन मिशनच्या देयकांच्या फायलींबाबत सरकारचा मोठा निर्णय; 'या' विभागाला वगळले

शहरात जूनमध्ये झालेल्या ‘जी २० परिषद’ बैठकांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही रस्त्यांचे स्वरूप पालटण्यात आले. त्याच धर्तीवर शहरातील १५ प्रमुख रस्ते ‘आदर्श’ करण्याचे महापालिका प्रशासनाने निश्‍चित केले होते. शहरातील १५ रस्त्यांपैकी ९ रस्त्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या पथ विभागाने पावसाळ्यानंतर एक ऑक्‍टोबरपासून संबंधित रस्त्यांवरील कामांना सुरुवात केली. मागील २३ दिवसांत आदर्श रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. १५ रस्त्यांपैकी सिंहगड रस्ता व बाणेर रस्त्यावरील अतिक्रमणे, ओव्हरहेड वाहिन्या, रस्त्यांवरील राडारोडा काढला आहे. पदपथ दुरुस्तीची कामे झाली आहेत. आता दुभाजक, रंगरंगोटीसाठची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहतूक चिन्ह, दिशादर्शक फलक व देखभाल दुरुस्तीचे काम आता हाती घेण्यात येईल.

Pune
Nashik : नाशिक झेडपीने काम वाटप समितीबाबत केली ‘या’ चुकीची दुरुस्ती

नगर रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्त्यासह उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून पदपथ दुरुस्ती करण्यात येत आहे. तेथे जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटारे, राडारोडा, कचरा काढणे, रंगरंगोटी, दुभाजकांवर शोभिवंत झाडांची लागवड, सिग्नल सिंक्रोनायझेशन, स्वच्छता, देखभाल दुरुस्ती, अनधिकृत प्लेक्‍स, होर्डिंग्जवर कारवाई, रस्त्यांवरील ओव्हरहेड वाहिन्या, रोहित्र काढणे आदी कामे होणार आहेत.

सेवा वाहिन्यांच्या नावाखाली वारंवार होणारा खोदाईचा प्रकार थांबविण्यासाठी वाहिन्यांसाठी आता स्वतंत्र पाइपही टाकण्यात येणार आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर टाकण्यात येणार आहे.

Pune
Nashik : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोलनाक्यावर सवलतीसाठी 31 ऑक्टोबरला बैठक

अतिक्रमण करणाऱ्यांवर नजर

महापालिका प्रशासनाने १५ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली आहेत. मात्र विक्रेते, स्थानिक नागरिकांकडून तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ शकते. त्याचबरोबर संबंधित रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, राडारोडा, स्वच्छता, रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘रोड मार्शल’ची नेमणूक होईल. त्यांच्याकडून अतिक्रमणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हे आहेत शहरातील ‘आदर्श रस्ते’

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता

Pune
Pune Nashik Expressway : असा असेल पुणे - नाशिक द्रुतगती प्रवास! पहा काय काय बदलणार?

आत्तापर्यंत सर्व रस्त्यांवरील कामे २० टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाली आहेत. सिंहगड रस्ता व बाणेर रस्त्यावरील अतिक्रमणे, ओव्हरहेड वाहिन्या व अन्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दुभाजक, रंगरंगोटीचे काम लवकरच पूर्ण होईल. सर्व रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com