Pune: पालिकेच्या 'त्या' कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी येणार?

PM Narendra Modi
PM Narendra ModiTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) पंतप्रधान आवास योजनेतून शहरात पाच ठिकाणी दोन हजार ९१८ सदनिका बांधल्या आहेत. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते व्हावे यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यास पंतप्रधान कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यास एक ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi
मुंबई मेट्रो स्थानकात गळतीमुळे बादल्या ठेवण्याची वेळ; बांधकामाच...

पुणे महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हडपसर सर्वे क्रमांक १०६-अ येथे ३४० सदनिका, हडपसर सर्वे क्रमांक ८९ येथे ५८४, हडपसर सर्वे क्रमांक १०६ येथे १०० सदनिका, खराडी सर्वे क्रमांक ५७ येथे ७८६ आणि वडगाव खुर्द सर्वे क्रमांक ३९ येथे ११०८ सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. कोरोनामुळे या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली.

या योजनेतील लाभार्थ्यांना ३३० चौरस फुटांचे घर मिळणार असून, त्याची एकूण किंमत ११ लाख रुपये आहे. त्यापैकी २.५० लाख रुपये शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहेत. उर्वरित रकमेसाठी नागरिकांनी कर्ज काढलेले आहे. नागरिकांना मार्च २०२३ मध्ये घराचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते. पण त्यानंतर २० जून, ५ जुलैची मुदत देण्यात आली होती. वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने लाभार्थ्यांना नेमके घर कधी मिळणार हे कळत नव्हते.

PM Narendra Modi
Nagpur: एक हजार 927 कोटींच्या 'या' प्रकल्पासाठी लवकरच निघणार टेंडर

या प्रकल्पांचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, काही कामे राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी येणार आहे. त्यामुळे या वेळी मोदींनी या कार्यक्रमासाठी वेळ देऊन या घरांचे लोकार्पण करावे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

PM Narendra Modi
समृद्धीनंतर 'या' 388 किमी ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गावर मोहोर

पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न असून, त्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com