Pune : विमान प्रवासापेक्षाही खासगी बसचे तिकीट का महागलेय?

private travels bus
private travels busTendernama
Published on

पुणे (Pune) : दिवाळीच्या काळात एसटी आणि रेल्वे फुल्ल असल्याचा फायदा खासगी बसचालक घेत आहेत. परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे एसटी तिकीट दराच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर घेण्याची मुभा खासगी बसचालकांना दिली आहे. प्रत्यक्षात एसटीच्या तुलनेत दुप्पट दर आकाराला जात आहे.

private travels bus
Pune : 2 हजार कोटींच्या 'त्या' योजनेचे काम 7 वर्षांनंतरही अपूर्णच; कारण काय?

दिवाळी संपल्यावर परतीच्या प्रवासात तर दर जवळपास तिप्पटच होतो. विमान प्रवासाचे सामान्य दर जितके आहेत, जवळपास तितके दर बसचालक आकारत असल्याने प्रवाशांची लूट केली जात आहे. पुण्याहून सुटणाऱ्या सुमारे ९०० खासगी बसचे २६ ऑक्टोबरला बुकिंग पूर्ण झाले आहे.

पुण्यातून दररोज सुमारे ९०० खासगी बसची वाहतूक होते. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने बसच्या संख्येतही वाढ होते. दिवाळीमध्ये सुमारे ६०० खासगी बस अतिरिक्त धावतात. अनेक बसचालक गाड्या दुसऱ्यांकडून भाडेतत्वावर घेतात. त्यामुळे अशा गाड्यांचे तिकीट दर अन्य बसच्या तुलनेत अधिक असते.

private travels bus
सिडकोच्या खारघरमधील 'त्या' घरांसाठी मुंबईकरांची झुंबड

राज्यात सर्वाधिक प्रवासी पुण्यातून मराठवाडा व विदर्भात प्रवास करतात. परराज्यात बंगळूर आणि हैदराबादसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असते. अनेक खासगी बसचालक ३०० किलोमीटरहून अधिक दूरच्या प्रवासासाठी धावणाऱ्या बसच्या दरात मोठी वाढ करतात. तुलनेत साध्या बससाठी (सीटिंग) कमी दरवाढ केली जाते. यंदा २८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. प्रवाशांनी २६ ऑक्टोबरपासूनच प्रवासाचे नियोजन केल्याने पुण्याहून सुटणाऱ्या सुमारे ९०० खासगी बस आताच बुक झाल्या आहेत.

वातानुकूलित शयनयान बसचे तिकीट दर (रु.)

ठिकाण --- सामान्य --- दिवाळीतील

पुणे-नागपूर --- १२०० --- २५००-३०००

पुणे-लातूर --- ६०० --- १२००-१५००

पुणे-इंदूर --- १२०० --- २५००-३०००

पुणे-पणजी --- ९०० --- १२००-१५००

पुणे-अहमदाबाद --- १२०० --- २२००-२५००

पुणे-बंगळूर --- १२०० --- २५००-३०००

पुणे-हैदराबाद --- १२०० --- २५०० ते ३०००

private travels bus
Karad : कऱ्हाड पालिकेत रंगलाय टक्केवारीचा खेळ; 10 कोटींचे टेंडर रद्द

परतीचा प्रवास आणखी महाग

दिवाळी संपल्यानंतर परतीचा प्रवास आणखी महाग होतो. कोणत्याही परिस्थितीत नोकरी निमित्ताने पुण्याला यावे लागते. त्यावेळी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे पुणे गाठण्यासाठी प्रवाशांना खासगी बसवर अवलंबून राहावे लागते. अशा वेळी खासगी बसचालक दिवाळीत जो दर आकारतात, त्यात आणखी ४०० ते ५०० रुपयांची वाढ करतात.

सामान्य दिवसाचे विमानाचे तिकीट दर (रु.)

पुणे-बंगळूर - ३५००

पुणे-अहमदाबाद - ३२००

पुणे-हैदराबाद - ४३००

पुणे-नागपूर - ४१००

पुणे-पणजी - ३२००

खासगी बसचालकांनी नियमाप्रमाणे तिकीट दराची आकारणी करणे अपेक्षित आहे. या संदर्भात चालकांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या जातील.

- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्रवासी व माल वाहतूक संघटना, पुणे

दिवाळीच्या काळात खासगी बसचालकांनी नियमापेक्षा जास्त दराची आकारणी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. बसच्या तपासणी करण्यासाठी वायू वेग पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.

- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com