Pune : ऑनलाइन वीजबिल भरण्यास का मिळतेय ग्राहकांची पसंती?

MSEB, Mahavitaran
MSEB, MahavitaranTendernama
Published on

पुणे (Pune) : महावितरणच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

MSEB, Mahavitaran
पुणे रिंग रोडवरील 'त्या' गावांमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन; 'एमएसआरडीसी'कडे जबाबदारी

यामध्‍ये पुणे जिल्ह्यात २५ लाख ८४ हजार तर पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ४१ लाख १२ हजार घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वीजग्राहक (८० टक्‍के) दर महिन्याला सुमारे ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा घरबसल्या करत आहेत. तर गेल्या तीन महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील १ कोटी २६ लाख ३८ हजार वीजग्राहकांनी ३५८७ कोटी ३२ लाख रुपयांचा वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

MSEB, Mahavitaran
Pune : प्रशासनाने आमचे पुनर्वसन दुसरीकडे करून गावच रिकामे करून घ्यावे! का संतापले नागरिक?

महावितरणची ग्राहकांसाठी सर्व प्रकारची ग्राहकसेवा एका क्लिकवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहून, कार्यालयीन वेळेत वीजबिल भरण्याऐवजी ऑनलाइन घरबसल्या २४ तास वीजबिल भरण्याची सोय आहे. यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे. तसेच स्वतःच्या दुसऱ्याच्‍या वीजजोडण्यांचे बिल ऑनलाइन भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करता येते.

MSEB, Mahavitaran
Satara : बापरे! शालेय गणवेशांचे कंत्राटही गेले अन् 14 कोटीही गेले

पेमेंट सवलतीच्‍या तरतुदी लागू

वीजबिलांचा ऑनलाइन पद्धतीने भरणा करणे सोयीचे व सुरक्षित आहे. या पद्धतीला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७च्या तरतुदी लागू आहेत. तसेच ऑनलाइनद्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते.

वीजबिल भरण्यासंदर्भात काही तक्रार किंवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ईमेलद्वारे महावितरणशी संपर्क साधू शकतात. तसेच वीजबिलांचा क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅंकिंगद्वारे ऑनलाइन भरणा केल्यास वीज बिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com