Pune : रूपाली चाकणकरांनी 'त्या' अधिकाऱ्याला का दिली समज?

rupali chakankar
rupali chakankarTendernama
Published on

पुणे (Pune) : सिंहगडावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नुकताच पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सिंहगड किल्ल्यावरील शिवप्रेमी आणि पर्यटकांसोबत संवाद साधून तेथील समस्यांवर चर्चा केली. चाकणकर यांनी सिंहगडावरील विविध विकासकामे, पर्यटकांसाठी सोयीसुविधा, महिला सुरक्षा या दृष्टीने विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने ही पाहणी केली.

rupali chakankar
Tender Scam : ॲम्ब्युलन्स महाघोटाळा! 10 हजार कोटींचे वादग्रस्त टेंडर अखेर 'सुमित', स्पेनस्थित 'SSG' अन् 'BVG'च्या घशात

यावेळी किल्ल्यावरील स्वच्छतागृहात पैसे घेत असल्याची तक्रार काही पर्यटकांनी केली. स्वच्छतागृहासाठी पैसे आकारू नये, असे राज्य महिला आयोगाच्या वतीने चाकणकर यांनी मागील काही दिवसांपूर्वीच सांगितलं होते. मात्र पुन्हा पैसे घेत असल्याची तक्रार काही महिला पर्यटकांनी केली. त्यावर तिथल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा समज देत तत्काळ एकही रुपया न घेता निःशुल्क स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध करून द्यावी, असे चाकणकर यांनी सांगितले.

rupali chakankar
Pune : दीड महिने थांबा; गणेशखिंड रस्त्यावरील कोंडी फुटणार? कोठे होणार नवा रस्ता?

सुरक्षा कठड्यांची झालेली दुरवस्था, किल्ल्यावर महिला सुरक्षेच्या दृष्टीने महिला सुरक्षा रक्षक नेमणे, गड परिसरात होणारा अतिरिक्त कचरा लक्षात घेऊन स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, पर्यटकांच्या सोयीसाठी तसेच सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी मिनी बसची व्यवस्था, गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्लास्टिक बाटल्यांचा होणारा वापर रोखण्यासाठी आणि मोफत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याच्या टाकीची सोय व्हावी या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ही कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा ग्रामीण महिला अध्यक्षा शुभांगी खिरीड व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com