Pune : पीएमसीने का हटविला 'तो' 8 किमीचा बीआरटी मार्ग?

BRT
BRTTendernama
Published on

पुणे (Pune) : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गापैकी विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौक हा तीनशे मीटर अंतराचा मार्ग पुणे महानगरपालिका प्रशासनाने रात्री जेसीबी लावून हटवला. वाहतूक कोंडीतून सुटका होईल असे कारण देत येरवडा ते विमाननगर चौक हा मार्ग दहा महिन्यांपूर्वीच हटवण्यात आला होता. आता नगर रस्त्यावर आठ किलोमीटर पैकी फक्त तीन किलोमीटरचा बीआरटी मार्ग शिल्लक राहिला आहे.

BRT
Eknath Shinde : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना; 15500 पदे भरणार

नगर रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी चे कारण देत या मार्गावरील बीआरटी हटवा अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांनी लावून धरली होती. रोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मार्गाकडे पुणे महानगरपालिकेचे आणि पीएमपीएलचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक वेळा या मार्गावर टीका होत होती. शिवाय बीआरटी प्रकल्पाच्या सदोष अंमलबजावणीमुळे अपघात होत होते.

BRT
Ajit Pawar : बारामतीकरांना लवकरच मिळणार गुड न्यूज! काय म्हणाले अजितदादा?

बीआरटी मार्गातील दोष दूर करण्याऐवजी पुणे महानगरपालिकेने गोखले इन्स्टिट्यूट कडून अहवाल मागवला आणि त्या आधारे 2023 च्या डिसेंबर महिन्यात येरवडा ते विमान नगर चौक बीआरटी हटवली. त्यानंतर विमान नगर चौक ते सोमनाथ नगर फाटा ही तीनशे मीटरची बीआरटी हटवण्याची मागणी स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्यासहित अनेक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने वाहतूक पोलिसांकडून अहवाल मागवला आणि मंगळवारी रात्री जेसीबी लावून बीआरटी हटवली.

BRT
'या' प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक वाटचालीला मिळणार नवी दिशा

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीआरटी हटवा अशी मागणी मी विधिमंडळात आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडे केली होती. बीआरटी हटवण्याबाबत गोखले इन्स्टिट्यूटचा अभिप्राय आल्यानंतर त्याचा पाठपुरावा केल्यामुळे बीआरटी काढण्यात आली. आता उर्वरित बीआरटी मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- सुनील टिंगरे, आमदार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com