Pune : लोणावळ्यातील खराब रस्त्यांबाबत नगरपरिषदेला कोणी दिली डेडलाईन?

Potholes
PotholesTendernama
Published on

पुणे (Pune) : लोणावळ्यातील खराब झालेले रस्ते ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ववत करावेत, तसेच गेली अनेक वर्षे रखडलेल्या नांगरगाव-भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश उच्च न्यायालय गठित तज्ज्ञ समितीच्या वतीने नगरपरिषदेस देण्यात आले.

Potholes
Eknath Shinde : 29 किमी लांब 'ठाणे रिंग मेट्रो' टप्प्यात; केंद्रीय मंत्री सकारात्मक

शहरातील प्रलंबित असलेली विकासकामे, समस्यांबाबत बैठकीत समितीचे अध्यक्ष डॉ. एस. राधाकृष्णन, सदस्य दिनेश राणावत, तनू तिवारी यांच्यासमोर भाजपच्या वतीने नगरपरिषदेस धारेवर धरले. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गटनेते देविदास कडू, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, बाळासाहेब जाधव, हर्षल होगले, अर्जुन पाठारे, नंदू जोशी, जयप्रकाश परदेशी यांच्यासह मुख्याधिकारी पंडित पाटील, नगरअभियंता पंढरीनाथ साठे आदी उपस्थित होते.

प्रामुख्याने भांगरवाडी व खोंडगेवाडी येथे नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते खराब झाल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब तज्ज्ञ समितीच्या पुढे आली. समितीच्या वतीने कडक भूमिका घेत विकास कामे पूर्ण करण्यासाठी ‘डेडलाईन’ निश्चित करण्यात आली.

Potholes
फडणवीसांच्या दाव्यावर राज ठाकरे म्हणाले, अन्यथा राज्यातील टोलनाके जाळून टाकू

खराब झालेले रस्ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नव्याने तयार करून घेण्यात यावेत व संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश तज्ज्ञ समितीच्या वतीने देण्यात आले. याचबरोबर भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपूल ३१ मे पर्यंत व टेबल लँड येथे असणारा कत्तल खाना ३१ मार्च अखेर अद्ययावत करण्याचे निर्देश समितीच्या वतीने देण्यात आले. विकासकामे न झाल्यास नगरपरिषदेने जबाबदारी निश्चित करावी, निविदा प्रक्रिया राबविताना दर्जाबाबत धोरण निश्चित करावे, अशा सूचनाही या वेळी करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com