पुणे तिथे सारेख उणे! स्ट्रक्चरल ऑडिटच्या 'त्या' अहवालाचे काय झाले?

Pune, Punekar, Mistake Not Tolerated
Pune, Punekar, Mistake Not ToleratedTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील होर्डिंग सुरक्षीत आहेत की नाही, याची व्यावसायिकांकडून तपासणी करून त्याचे अहवाल सादर करा, असा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सर्व परिमंडळ उपायुक्तांना दिले होते. मात्र, स्ट्रक्चरल ऑडिटला होर्डिंग व्यावसायिकांनी ठेंगा दाखविला आहे. एक अहवालदेखील आकाश चिन्ह विभागाकडे प्राप्त झालेला नाही. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या परिमंडळ उपायुक्तांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

Pune, Punekar, Mistake Not Tolerated
7 तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अवकाळी पावसात अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा बळी गेला. पुण्यातही प्रत्येक रस्त्यावर, चौकात इमारतीवर, मोकळ्या जागेत मोठे होर्डिंग उभे आहेत. त्यातील दोन हजार ४८५ होर्डिंग अधिकृत, तर एक हजार ४०० होर्डिंग अनधिकृत आहेत. त्यावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही, त्याच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रक काढले आहे.

हवामान विभागाने पुणे शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या वादळात होर्डिंग पडून जीवित व वित्तीय हानी होऊ शकते, वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. या घटना टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करावा. जे व्यावसायिक अहवाल सादर करणार नाहीत, त्यांचे होर्डिंग अनधिकृत समजून नोटीस देत काढण्याची कारवाई सुरू करावी.

Pune, Punekar, Mistake Not Tolerated
Sambhajinagar: MIDCच्या धोकादायक दोन मजली इमारतीत भाडेकरूंचा कब्जा

कारवाई करताना प्रामुख्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी व धोकादायक झालेले अनधिकृत होर्डिंग काढावेत. आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांनी दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवून स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल आले आहेत की नाही? याचा दैनंदिन अहवाल सादर करावा असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

डॉ. खेमनार यांनी हे परिपत्रक १८ एप्रिल रोजी काढले होते. त्यानंतर ते आकाशचिन्ह विभागाकडून परिमंडळाचे उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना निरीक्षक यांना पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते. मात्र, याकडे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

आकाशचिन्ह विभागाकडे एकाही होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचा अहवाल सादर झालेला नाही. अतिरिक्त आयुक्तांनी आदेश देऊन जवळपास दीड महिना होत आला, तरी कार्यवाही न केल्याने परिमंडळाच्या उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

Pune, Punekar, Mistake Not Tolerated
Pune: चुकीला माफी नाही! समाविष्ट गावांतील कारवाईला PMC देणार गती

पुणे शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मुदतीत एकही अहवाल आकाशचिन्ह विभागाला प्राप्त झाले नसल्याने परिमंडळाच्या उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. जे होर्डिंग धोकादायक झाले आहेत, ते काढणे आवश्‍यक आहे.

- माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com