Pune : वाहतूक कोंडीवर काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील?

Traffic Jam
Traffic JamTendernama
Published on

पुणे (Pune) : कोथरूडमधील वाहतूक समस्येसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बैठक बोलावून समस्या व उपाययोजना यावर अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांशी चर्चा केली. यामध्ये कोथरूडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून त्याद्वारे ही वाहतूक नियमन करणे शक्य होईल अशा सूचना पाटील यांनी बैठकीत दिल्या.

Traffic Jam
Tendernama Exclusive: राज्यात 'रोहयो'च्या योजनांची 'टॉप टू डाऊन' उलटी गंगा; सिंचन विहिरींवर तब्बल 1,056 कोटींचा खर्च..

यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर असून, प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करावा. त्यातील निष्कर्षांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू.‌ तातडीने पूर्ण होऊ शकणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य क्रम ठरवून काम करावे. कोथरूडमधील वाहतूक समस्यांसंदर्भात दर आठवड्याला प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहे.’’

वाहतूक शाखेला मनुष्यबळ कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवावी. वाहतूक नियमनासंदर्भात जनजागृतीसाठी एनएसएसची मदत घ्यावी आदी सूचना देण्यात आल्या. कोथरूडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली.

Traffic Jam
MSRTC: तोट्यात गेलेली ST 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच कशी फायद्यात आली?

उपाययोजना

अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सुचवलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे ः पौड रोड आणि कर्वे रोड येथील अभिनव चौकाच्या दोन्ही बाजूचा रस्ता रुंद करणे, आनंद नगर मेट्रो स्टेशनजवळ पौड रोड रुंद करणे, कर्वे पुतळ्याकडे जाणारे पौड रस्त्याचे डावे वळण रुंद करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कर्वेनगर ते वारजेपर्यंतचा रस्ता रुंद करणे, कमिन्स गेटसमोरील डी. पी. रस्ता रुंद करणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील रस्ता रुंद करणे, वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी कोथरूडमधील मिसिंग लिंक शोधून त्या पूर्ण करणे, रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी जमीन हस्तांतरण आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस आणि महापालिकेच्या रस्ते विभाग आणि पथ विभागाने समस्यांचे निराकरण करावे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com