Pune : आणखी एक टेंडर काढा, पण पुणेकरांना होणारा त्रास थांबवा..! असे का म्हणाले आयुक्त?

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरात भटक्या श्‍वानांची दहशत वाढत आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना बसत आहे. गेल्या अडीच वर्षांत तब्बल ४२ हजार ६६५ हजार जणांना श्‍वानांनी चावा घेतला आहे. यामध्ये एकाही नागरिकाचा रेबीज होऊन मृत्यू झालेला नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. शहरातील भटक्या श्‍वानांचा आढावा घेत नसबंदी करण्याचे काम आणखी वेगात होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आणखी दोन संस्थांची नियुक्ती करण्यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया राबविण्याची सूचना गुरुवारच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी दिली.

PMC Pune
Nashik : नाशिकरांसाठी गुड न्यूज! रविवारपासून Indigo ची देशातील 'या' 11 शहरांसाठी विमानसेवा

शहरातील भटक्या श्‍वानांसंदर्भात गुरुवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे या वेळी उपस्थित होत्या.

महापालिकेने २०१८ मध्ये भटक्या श्‍वानांची गणना केली होती. त्यात ३ लाख १५ हजार श्‍वानांची नोंद झाली होती. तर, २०२३ मध्ये केलेल्या गणनेत ही संख्या कमी होऊन १ लाख ७९ हजार ९४० इतकी झाली आहे. महापालिकेने नसबंदी कार्यक्रम व्यवस्थित राबविल्याने श्‍वानांची वाढ रोखण्यात यश आले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. मात्र, शहरातील भटक्या श्‍वानांचा त्रास कमी झालेला नाही. पहाटे आणि रात्रीच्या वेळी श्‍वानांचा हल्ला होत असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. २०२१ पासून या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

PMC Pune
Nashik : 600 रुपयांत वाळूसाठी आता नव्याने टेंडर प्रक्रिया

दरम्यान, शहरातील भटक्या श्‍वानांचा आढावा घेत नसबंदी करण्याचे काम आणखी वेगात होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आणखी दोन संस्थांची नियुक्ती करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्याची सूचना गुरुवारच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी दिली. याशिवाय जखमी, आजारी श्‍वानांवर उपचार करण्यासाठीही संस्थांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरातील पाळीव श्‍वानांची माहिती एकत्र करून त्यांना अल्प दरात लस देण्याची योजना महापालिका आणणार आहे. त्यामुळे रेबीजवर नियंत्रण आणणे शक्य होईल.

PMC Pune
Nashik : बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी साडेतीन कोटींचे फॅब्रिकेटेड शॉप; पालकमंत्री भुसेंचा निर्णय

भटक्या श्‍वानांची नसबंदी करण्याच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी आणि आजारी श्‍वानांवर उपचारासाठी संस्थांची नियुक्ती करण्याच्या सूचना आयुक्तांनी आजच्या आढावा बैठकीमध्ये दिल्या.

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

५२ जणांचा मृत्यू

२०२१ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत पुणे महापालिकेच्या हद्दीत एकाही व्यक्तीचा रेबीजने मृत्यू झालेला नाही. पण, महापालिकेच्या हद्दीबाहेर श्‍वान चावल्याने व पुण्यात उपचारासाठी आलेल्या ५२ जणांचा रेबीजने मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

वर्ष - श्‍वानांनी चावा घेण्याच्या घटना

२०२१- १२,०२४

२०२२ - १६,५६९

२०२३ ऑगस्टपर्यंत - १४,०७२

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com