Pune: यामुळे कधीच होणार नाही मेट्रोची धडक; दर 2 मिनिटांना सुटणार..

Metro
MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : Pune Metro मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी जागतिक दर्जाची अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम’च्या (CBTC) चाचण्यांना वनाज-गरवारे (Wanaj-Garware) मार्गावरील मेट्रोमध्ये प्रारंभ झाला आहे. या सिग्नलिंग प्रणालीमुळे दर दोन मिनिटाला ट्रेन सोडणे शक्य होणार आहे. तसेच यामुळे मेट्रो ट्रेन स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे.

Metro
मेट्रो रेल्वे करणार नागपूर कलेक्टर ऑफिसचे बांधकाम; 200 कोटींचे...

सीबीटीसी प्रणालीमध्ये रेडिओ कम्युनिकेशनद्वारा ट्रेनच्या स्थानाची, वेगाची आणि इतर महत्त्वाची माहिती सतत ट्रेनमधील कॉम्पुटरद्वारा व ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टमद्वारे नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार आहे. यामुळे दोन मेट्रो ट्रेन एकमेकांजवळ येणे अथवा त्यांची धडक होणार नाही. काही कारणास्तव एखादी ट्रेन थांबली तर तिच्या मागची ट्रेन आपोआप सुरक्षित अंतर ठेऊन उभी राहील.

Metro
LIVE रिपोर्ट : बाळासाहेबांच्या स्मारकाचे देणे कोट्यावधींचे

प्रत्येक ट्रेनमध्ये एक उच्च दर्जाचा कॉम्पुटर असेल. तो विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्कात असेल. तसेच इतर ट्रेनमध्ये असलेल्या कॉम्पुटरशी सतत संपर्कात असेल व ट्रेनच्या स्थानाची अचूक माहिती अद्ययावत करत राहील. चाचण्यांमध्ये वनाझ व नळ स्टॉप या विभागांत एकाचवेळी सध्या तीन ट्रेन चालविण्यात येत आहेत. पुढच्या टप्प्यात चाचण्या पिंपरी चिंचवड-फुगेवाडी मेट्रो मार्गावर होतील. येत्या तीन महिन्यांत ही यंत्रणा दोन्ही मार्गांवर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले आहे. वनाज-गरवारे मार्गावर सध्या रोज सरासरी आठ हजार प्रवासी मेट्रोचा वापर करीत आहेत.

Metro
नाशिकला ठेकेदारांची ४० कोटींची देयके २० दिवसांपासून प्रलंबित

सीबीटीसी सिग्नलिंगची वैशिष्ठ्ये
- दर दोन मिनिटाला सुरक्षितपणे ट्रेन सोडणे शक्य
- मेट्रो प्रणालीचा संपूर्ण क्षमतेने वापर, जास्तीत जास्त ट्रेन चालवणे शक्य
- प्रवाशांना ट्रेनच्या स्थानाची व ट्रेनच्या वेळेची अचूक माहिती मिळू शकेल
- ट्रेनचे संचलन स्वयंचलित पद्धतीने होणार, चालक फक्त यंत्रणेवर देखरेख करणार
- ट्रेन चालू करणे, तिचा वेग वाढवणे आणि ती फलाटावर नियोजित जागेवर थांबवणे ही प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार

Metro
'या' कारणामुळे रखडला नागपुरातील विधान भवनाचा विस्तार? वादग्रस्त...

सीबीटीसीच्या चाचण्या हा पुणे मेट्रोच्या पूर्णत्वाकडे जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही सिस्टीम महत्त्वाची आहे. अल्पावधीतच पुणे मेट्रो फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय व गरवारे ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान धावेल.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com