Pune: पुणेकरांना Property Tax वरील सवलतीसाठी 'ही' आहे शेवटची संधी

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : मिळकतकराची सवलत घेण्यासाठी कालचा (ता. ३१ जुलै) शेवटचा दिवस असताना महापालिकेचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याने व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा फटका नागरिकांना बसल्याने ही सवलत उद्या पर्यंत (ता. २ ऑगस्ट) वाढविण्यात आली आहे. मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी ही माहिती दिली.

PMC Pune
समृद्धीवरच्या दुर्घटनेत नेमकं काय घडलं?; जाणून घ्या इनसाईड स्टोरी

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना १५ मे ते ३१ जुलै या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये निवासी मिळकत करावर पाच ते दहा टक्के सूट देण्यात आली होती. गेल्या अडीच महिन्यात महापालिकेला सुमारे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न यामधून मिळालेले आहे.

काल (ता. ३१ जुलै) या सवलतीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कर भरणा करण्यासाठी नागरिकांची गडबड सुरू होती. ऑनलाइन माध्यमातून तसेच क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुरुवातीला सुविधा केंद्र मध्ये जाऊन नागरिक कर भरत होते.

काल सकाळी दहा वाजता क्षेत्रिय कार्यालय सुरू झाल्यानंतर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र एकाच वेळी अनेक नागरिक संकेतस्थळावर कर भरत असल्याने महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा कोलमडून गेली होती.

PMC Pune
मंत्री अतुल सावे अन् 'ज्ञानदीप'चे अर्थपूर्ण साटेलोटे पुन्हा उघड!

संकेतस्थळ सुरू होत नसल्याने नागरिकांना कर भरता येत नव्हता. त्याचप्रमाणे अनेक नागरिक नागरिक सुविधा केंद्रांमध्ये जाऊन रांगेमध्ये उभे होते पण येथील यंत्रणा देखील बंद पडली होती.

गेल्या वर्षी देखील शेवटच्या दिवशी कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती. त्यामुळे महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा बंद पडली होती. त्यानंतर दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली होती. यंदाच्या वर्षी देखील महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा क्रॅश होण्याची नामुष्की ओढवलेली आहे.

PMC Pune
गडकरींनी उद्घाटन केलेल्या 613 कोटींच्या 'या' रस्त्याची लागली वाट

नागरिकांची झालेली अडचण लक्षात घेऊन मिळकतकराची सवलतीसाठी २ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख म्हणाले की, महापालिका हद्दीतील मिळकतधारकांना ३१ जुलै पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास करावर ५ किंवा १० टक्के सवलत देण्यात आली होती. परंतु आज अखेरच्या दिवशी काही तांत्रिक कारणास्तव मिळकतकर भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. मिळकतधारकांची व लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करता मिळकतकर सवलतीमध्ये भरण्याची मुदत २ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली. तसेच लॉटरी योजनेचा कालावधी देखील २ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com