Pune : ...तर मिळणार नाही वाहन परवाना! RTO मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Accident Zone
Accident ZoneTendernama
Published on

पुणे (Pune) : अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास त्यांना वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत देशातील कोणत्याही आरटीओ (RTO) कार्यालयाकडून वाहतूक परवाना मिळणार नाही. पुणे आरटीओ (Pune RTO) कार्यालयाने तसा प्रस्ताव तयार केला असून, तो राष्ट्रीय सूचना केंद्र (एनआयसी NIC) व परिवहन आयुक्तालयात पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाली, तर अल्पवयीन मुलास कोणत्याही परिस्थितीत कोणत्याच प्रकारचा वाहन परवाना दिला जाणार नाही.

Accident Zone
होऊ दे खर्च! राज्य सरकार प्रचार प्रसिद्धीवर उडवणार 475 कोटी; 'लाडकी बहिण' योजनेवर एवढी खैरात

देशात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे परिवहन विभाग विविध पातळींवर काम करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने वाहन परवानाचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेला.

या पार्श्‍वभूमीवर पुणे आरटीओ प्रशासनाने राष्ट्रीय सूचना केंद्राला प्रस्ताव दिला आहे. त्यात अल्पवयीन मुलगा वाहन चालविताना आढळल्यास त्याला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्याच प्रकारचा परवाना द्यायचा नाही.

Accident Zone
'आनंदाचा शिधा' टेंडरमध्ये गोलमाल अंगलट; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

‘एनआयसी’ची यंत्रणा वाहन परवान्याशी संलग्न असलेल्या सारथीशी जोडलेली आहे. त्यामुळे एखादा अल्पवयीन मुलगा ज्याच्यावर कारवाई झालेली आहे, अथवा ज्याची नोंद ‘एनआयसी’कडे झाली आहे; त्याने देशातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात कागदपत्रे सादर केली, तरीही त्याला वाहन परवाना दिला जाणार नाही.

‘एनआयसी’सह परिवहन आयुक्त कार्यालय यासाठी सकारात्मक असल्याचे कळते. यास परिवहन आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्यास ‘एनआयसी’देखील प्रस्तावाला मंजुरी देईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा निर्णय देशपातळीवर राबविला जाण्याची शक्यता आहे.

Accident Zone
Nagpur : राज्य सरकारचा भर सौर ऊर्जा प्रकल्पांवर; 1564 कोटी खर्चून उभारणार...

परिवहन आयुक्त कार्यालय व ‘एनआयसी’कडे प्रस्ताव दिला आहे. त्याला मंजुरी मिळताच देशातील सर्व आरटीओ कार्यालयात याची अंमलबजावणी होईल.

- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com