Pune : निवडणुकीच्या आचारसंहितेचा पुणेकरांना असाही फटका! आणखी 4 महिने...

Pune city
Pune cityTendernama
Published on

पुणे (Pune) : प्रवाशांना पीएमपीच्या (PMP) नव्या ७०० सीएनजी बसमधून (CNG) प्रवास करण्यासाठी आणखी किमान चार महिने वाट पहावी लागणार आहे. यातील ४०० बस भाडेतत्त्वाच्या असून ३०० स्वमालकीच्या असतील. सध्या या दोन्ही प्रकारच्या बससाठी टेंडर (Tender) प्रक्रिया पूर्ण झाली असून ‘वर्क ऑर्डर’ लवकरच निघेल.

Pune city
Pune : पुण्यातील प्रवाशांना रेल्वे देणार गुड न्यूज; ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...

नव्या बस जूनपर्यंत दाखल होणार होत्या, मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे विलंब झाल्याचे पीएमपीचे म्हणणे आहे. आता ‘वर्क ऑर्डर’ निघाल्यावर ‘प्रोटोटाइप’ तयार केले जाईल. त्यानंतर उत्पादन होईल.

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४०० सीएनजी बस भाडेतत्वावर घेण्यास मान्यता मिळाली होती. शंभर बस स्वमालकीच्या घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. आणखी २०० बस स्वमालकीच्या घेण्याचा निर्णय नुकताच झाला. या बस १२ मीटर लांबीच्या असतील.

Pune city
Pune : भूमिपूजन न करता थेट स्मारकाच्या कामाला सुरवात; कारण काय?

बसचा तुटवडा

पीएमपीच्या सातपैकी दोन ठेकेदारांची सेवा संपली आहे. त्यामुळे दोनशेहून जास्त बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध नाहीत. ६० बसचे आयुर्मान जून महिन्यात संपले. सध्या १६०० बस प्रवासी सेवेत धावत आहेत. यातील साधारण ६० ते ७० बस रोज ब्रेकडाऊन होतात. त्यामुळे प्रवासी सेवेसाठी उपलब्ध बसची संख्या आणखी कमी होते. त्यामुळे प्रवासी सेवा सुधारण्यासाठी बसची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

तीन लाख ६५ हजार प्रवाशांची सोय

सीएनजीच्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ७०० बसच्या माध्यमातून दिवसाला किमान ५ लाख ११ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. जागेअभावी अनेक प्रवाशांना रोजच उभे राहून प्रवास करावा लागतो. बसची संख्या वाढल्यास त्याचे प्रमाण कमी होईल.

Pune city
Pune : फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांतील टीपी स्कीमचे भवितव्य अंधारात, कारण...

भाडेतत्त्वावरील आणि स्वमालकीच्या बस घेण्यासाठीच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन महिन्यांनंतरच काही बस दाखल होण्यास सुरवात होईल. पीएमपीला सर्व बस मिळण्यास किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- दीपा मुधोळ- मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com