Pune: सांगा आम्ही जायचं कुठं? कोट्यवधी खर्चूनही उद्याने भकासच

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : वर्षातून एकदा मिळणारी मोठी उन्हाळ्याची सुटी लागली की बच्चेकंपनीची पावले आपोआप उद्यानांकडे वळतात. धम्माल, मजामस्ती, खेळणं-बागडणं असं बरंच काही या सुटीच्या काळात होत असतं. मात्र शहरासह उपनगरांतील उद्यानातील तुटलेली खेळणी, पिण्याच्या पाण्याचा अभाव, अस्वच्छ स्वच्छतागृह, कचरा अशा समस्या पाहून त्यांचा हिरमोड होत आहे. दरवर्षी महापालिका उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असली प्रत्यक्षात मात्र स्थिती धक्कादायक असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

PMC Pune
Thane: नालेसफाईत कोणी केली 10 कोटींची हातसफाई?

शिक्षणाचे माहेरघर, आयटी, ऑटोमोबाईल हब अशी पुणे शहराची ओळख निर्माण झालेली आहे. त्यात आता उद्यानांचे शहर म्हणूनही पुण्याचा उल्लेख केला जातो. सारसबाग हे पुण्यातील पहिले उद्यान असून, १७५० मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी हे उद्यान व कृत्रिम तलाव विकसित केला होता.

स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये महापालिकेने छत्रपती संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यानांची निर्मिती केली. त्यानंतर शहराच्या विविध भागांत उद्याने उभी राहत गेली. तेव्हापासून आत्तापर्यंत २०२३ पर्यंत २१० उद्याने विकसित झाली असून, या उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ ६५० एकर इतके आहे. सध्या पाच उद्यानांचे काम सुरू असून, यापैकी चार उद्याने या वर्षात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

उद्यानांची संख्या वाढली असली तरी संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यान, पु. ल. देशपांडे उद्यान यासह काही मोजक्या उद्यानांची स्थिती चांगली आहे. इतर ठिकाणी उद्यानांची देखभाल करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी बाक, कचरा पेटी, खेळणी, नळकोंडाळे, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचा अभाव यासह अनेक प्रकारची दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे.

PMC Pune
Nashik ZP : 2538 पदांची लवकरच आयबीपीएसच्या माध्यमातून भरती

महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक या ठिकाणी रोज जातात; पण त्यांच्याकडून सुधारणा करण्याकडे लक्ष दिले जाते, दोन ते तीन दिवसांत दुरुस्ती केली जाते, असा दावा अधिकारी करत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचेच दिसून आले आहे.

समाविष्ट गावांची उपेक्षाच
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांचा विकास आराखडा अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे उद्यानांचे आरक्षण निश्‍चित झालेले नसल्याने या भागात एकही उद्यान नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागाच उपलब्ध नाही.

पुण्यातील उद्यानांचा पसारा

शहरातील उद्यानांची संख्या - २१०
उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ - ६५० एकर
रोज भेट देणारे नागरिक - सुमारे १.५ लाख
कर्मचारी संख्या - ३५०
तैनात सुरक्षारक्षक - ७००
२०२३-२४ साठी तरतूद - ४५ कोटी
नव्या उद्यानांसाठी तरतूद - ३ कोटी

PMC Pune
EV: नाशिककरांना महिनाभरात मिळणार ही Good News; लवकरच निघणार टेंडर

येत्या वर्षात काळेपडळ, अभिरुची मॉल, हडपसर व विमाननगर येथील उद्याने पूर्ण विकसित होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होतील. सर्व उद्याने सुस्‍थितीत आहेत. सुविधा व खेळण्यांची दुरावस्था झाली असेल तर लगेच दुरुस्त केली जाते.
- अशोक घोरपडे, अधिक्षक, उद्यान विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com