Pune : पुणे - दौंड रेल्वेमार्गावर वाढला गाड्यांचा वेग; काय आहे कारण?

Railway Track
Railway TrackTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे - दौंड लोहमार्गावर लोणी स्थानकाजवळच्या वळणावर ‘२ टर्न आउट’ असल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २००८ साली रेल्वे गाड्यांना या सेक्शनमधून ताशी ६५ किलोमीटरची वेग मर्यादा लावली होती. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत होता. नुकतेच रेल्वे प्रशासनाने त्या ‘२ टर्न आउट’ ची जागा बदलली. तसेच त्या ठिकाणचे रखडलेले ‘ओएचइ’चे अवघड असे काम मार्गी लावले.

Railway Track
Amravati : 'या' झेडपी शाळांसाठी होणार 247 कंत्राटी शिक्षक भरती

परिणामी आता या सेक्शनमधून रेल्वे गाड्या ताशी १३० किलोमीटरच्या वेगाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत आता पाच ते सात मिनिटांची बचत होत आहे.

लोणीहून दौंडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरच्या वळणावर एके ठिकाणी ‘२ टर्न आउट’ होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असायची. रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या सेक्शनमधून धावणाऱ्या गाड्यांचा वेग कमी केला.

Railway Track
Sambhajinagar : दीड लाख बीडबायपासकरांची मृत्युच्या दाढेतून कोण करणार सुटका?; काय आहे कारण...

त्यावेळी पुणे ते दौंड दरम्यानचा वेग हा ताशी ११० किलोमीटरचा होता. पण हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेल्वे ६५ किलोमीटर वेगाने धावत होत्या. २०१७- १८ साली या सेक्शनमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ‘२ टर्न आउट’ची जागा बदलण्याचा निर्णय झाला. त्याला मान्यता देखील मिळाली. पण काही केल्या काम होत नव्हते.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्यावर प्रशासनाने अवघ्या आठ दिवसांत काम पूर्ण केले. त्यामुळे आता पुण्याहून धावणाऱ्या व पुण्याला येणाऱ्या रेल्वेच्या गतीत वाढ झाली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे.

Railway Track
Mumbai : 'या' नव्या मार्गामुळे एमएमआर क्षेत्रातील सर्व शहरे महामार्गाशी जोडली जाणार

वेग वाढविण्यासाठी आवश्यक असलेली कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पूर्वीची वेग मर्यादा हटविण्यात आली आहे. आता रेल्वे गाड्यांचा वेग वाढला. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com