Pune : मिळकत कर भरण्यास टाळाटाळ करणे भोवले

Property Tax
Property TaxTendernama
Published on

पुणे (Pune) : मिळकत कर वेळेत न भरल्याने परंदवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्यासह इतर दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले.

सरपंच अलका दत्तात्रेय पापळ, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिवराम पापळ व दामू गणपत ठाकर अशी अपात्र सदस्याची नावे आहेत. २०२१ मध्ये सर्व सदस्यांनी मिळकतीची थकबाकी भरण्याबाबत ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती. मात्र, ९ पैकी ६ सदस्यांनी मिळकत भरला व ३ सदस्यांनी तो भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ग्रामस्थ चंद्रकांत रामभाऊ भोते व भरत बबन भोते यांनी या सदस्यांना अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते.

Property Tax
शाब्बाश रे पठ्ठ्या! ठाण्यातील बिल्डरचा महाप्रताप; म्हाडाच्या जमिनीवर काढले 200 कोटींचे कर्ज

ग्रामपंचायतीने सदस्यांना पाठवलेल्या बिलावरील पोचमध्ये असलेल्या तारखा संदिग्ध असल्याचे कारण देत जिल्हाधिकारी यांनी अपील फेटाळले होते. त्यानंतर भोते यांनी जिल्हाधिकारी यांच्या निकालाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते.

वर्षभरापूर्वीच अलका पापळ यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. या तीनही सदस्यांचा कार्यकाल २३ फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु अपात्रतेच्या कारवाईमुळे मुदतीपूर्वीच तिघांनाही पायउतार व्हावे लागत आहे.

Property Tax
आता मंत्रालयावर असणार 'घारी'ची नजर; 41 कोटींचे बजेट

सरपंच सांगत आहेत, ते चुकीचे आणि न्यायालयाची दिशाभूल करणारे आहे. आम्ही यापुढेही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू.

- चंद्रकांत भोते, माजी उपसरपंच, परंदवडी

अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. आम्हाला ते पूर्णपणे मान्य आहे.

- अलका दत्तात्रेय पापळ, सरपंच, परंदवडी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com