पुणे (Pune) : रेल्वेच्या आग्रा विभागातील ‘मथुरा जंक्शन’ येथे यार्ड रीमॉडेलिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून दिल्लीला (Pune Delhi Trains) जाणाऱ्या पाच रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने अचानक ब्लॉक घेतल्याने चार महिन्यांपूर्वी तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांची अडचण होणार आहे. याचा फटका दिल्लीसह जम्मूतवी, चंडीगड येथे जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. चार फेब्रुवारीपर्यंत पाच रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्या रद्द
- पुणे- जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस
- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस- हजरत निझामुद्दीन - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
- पुणे-हजरत निझामुद्दीन-पुणे एक्स्प्रेस
- मिरज-हजरत निझामुद्दीन-मिरज एक्स्प्रेस
- यशवंतपूर-चंडीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस
थोडा दिलासा
रेल्वे प्रशासनाने पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द केल्या असल्या तरी ब्लॉकच्या वेळेत काही रेल्वे गाड्यांच्या परिचालनात बाधा येत नसल्याने त्या गाड्या रद्द झालेल्या नाहीत. यात वास्को द गामा-निझामुद्दीन- वास्को (गोवा एक्स्प्रेस) व यशवंतपूर-हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस या दोन रेल्वे धावणार आहेत.