Pune: पीएमपी का म्हणते... 5 रुपयांत 5 किलोमीटर नको रे बाबा!

PMP
PMPTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहर (Pune City) आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri - Chinchwad) पीएमपीच्या डेपोपासून (PMP Depot) पाच किलोमीटरच्या अंतरासाठी ५ रुपये तिकीट आकारणी बंद झाली असून, आता त्या मार्गांवर नेहमीप्रमाणे तिकीट आकारले जाणार आहे. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपये तिकीट आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा बदल पीएमपीच्या २८ मार्गांवर होणार आहे.

PMP
Vande Bharat : मुंबई-शिर्डी रेल्वेला 64 टक्केच प्रतिसाद, कारण...

पीएमपीने २५ ऑक्टोबर २०२० पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकीट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी ५६ मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद करून २८ मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती.

बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता ५ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये तिकीट आकारणीमुळे पीएमपीने आर्थिक नुकसान होत होते. त्यातून संचलनातील तूटही वाढत होती. त्यामुळे या २८ मार्गांवर १९ फेब्रुवारीपासून नेहमीच्या दराने तिकीट आकारणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

PMP
Nashik : नाशिक-पुणे रेल्वेसाठीचे भूसंपादन थांबवा; महारेलचे पत्र

या मार्गांवर होणार नेहमीच्या दराने तिकीट आकारणी

(डेपो आणि त्यातंर्गतचे मार्ग)

  • स्वारगेट - पुणे स्टेशन- ताडीवाला रस्ता, पुलगेट ते शीतल पेट्रोल पंप

  • नरवीर तानाजी वाडी - डेक्कन - गोखलेनगर, डेक्कन- नीलज्योती

  • कोथरूड - कोथरूड स्टॅंड ते कोथरूड स्टॅंड (वर्तुळाकृती मार्ग), गालिंदे पथ ते दांगट वस्ती, कर्वेनगर (गार्डन सिटी) ते कर्वेनगर (वर्तुळ)

  • कात्रज - जांभुळवाडी, नह्रेगाव, गुजरवाडी, येवलेवाडी, वाघजाईनगर

  • हडपसर - सासवड रोड रेल्वे स्टेशन, महंमदवाडी, फुरसुंगी, मांजरी, संकेतविहार, मांजरी बुद्रुक

  • अप्पर डेपो - मार्केटयार्ड- शत्रुंजय मंदिर (वर्तुळ), कात्रज- कोंढवा रोड- अप्पर डेपो

  • निगडी - निगडी- रूपीनगर, खंडोबामाळ ते चिखली

  • भोसरी - भोसरी- दिघी, चऱ्होलीगाव- आळंदी

  • पिंपरी - चिंचवडगाव - वाल्हेकरवाडी

  • बालेवाडी - चिंचवडगाव - आकुर्डी रेल्वे स्टेशन

PMP
Nashik : टोल प्लाझाचे टेंडर घेण्यासाठी सात लाखांची लाच घेताना अटक

त्याच बरोबर दहा रुपयात पुणेकरांना प्रवासाची सेवा देणाऱ्या पुण्यदशम या योजनेमुळे पीएमपीच्या तोट्यात भर पडते आहे. कारण या योजनेसाठीचा निधी पालिकेकडून वेळेत मिळत नसल्याने ही योजना पीएमपीकडून बंद केली जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com